तांदूळसा ( amaranth vegetable in marathi ) ही बाराही महिने मिळणारी पालेभाजी आहे. तिच्यात उच्च प्रतीचे घटक व पोषक गुण खूप असतात. आयुर्वेदाने ही भाजी आरोग्याच्या दृष्टिने श्रेष्ठ मानली आहे.
गुणधर्म ः ही भाजी क्षारधर्मी आहे. ती पित्तनाशक, रक्तदोषहारक, विषहारक, कफनाशक असून रक्तपित्तमध्ये व शीतपित्तामध्ये गुणकारी आहे. तसेच खोकल्यामध्ये देखील ती उपयुक्त आहे. तांदूळसा ( amaranth vegetable in marathi ) मधुर, शीतल, रुचकर, क्षुधावर्धक, मूत्रगामी, लघु, रुक्ष, हितकारक व रेचक आहे. तापामध्ये या भाजीचे सूप गुणकारी असते.
घटक ः
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी100 ग्रॅम
जीवनसत्त्व सी100 ग्रॅम
पाणी85 टक्के
प्रोटीन3 टक्के
चरबी0.3 टक्के
कर्बोदित पदार्थ8.1 टक्के
खनिज पदार्थ3.6 टक्के
कॅल्शियम0.8 टक्के
फॉस्फरस0.05 टक्के
लोह22.9 मि. ग्रॅम.
तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) मध्ये लोह हा घटक पुष्कळ प्रमाणात असल्याने पांडुरोगामध्ये ही भाजी अत्यंत उपयुक्त असते. या भाजीत सी जीवनसत्त्वामुळे रक्तपित्ताचा त्रास कमी होतो. ही भाजी शिजवून खाण्यापेक्षा तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) चा कच्चा रसच घेतला तर जास्त उपयुक्त असतो. भाजी वाटून तिचा रस काढता येतो.
औषधी उपयोग ः तांदुळसा ( amaranth vegetable in marathi )ची भाजी रसस्वरूपात मूत्रगामी आहे, म्हणून मूत्रविकारात ती गुणकारी आहे. स्त्रियांच्या अनेक आजारांवर ती रामबाण उपाय आहे. विषबाधा झाली असेल तर त्याचा निचरा करण्यास ही भाजी सहाय्य करते. म्हणूनच अधूनमधून या भाजीचा रस सेवन करावा म्हणजे शरीरात असणाऱ्या निरुपयोगी पदार्थ व विषारी द्रव्यांचा आपोआपच निचरा होतो. तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) मध्ये ए जीवनसत्त्व भरपूर असते जे डोळ्यांच्या विकारांवर इलाज करते. केस गळत असल्यास तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) चा कच्चा रस काही दिवस घ्यावा. बध्दकोष्ठतेचा विकार असेल तर तांदुळसा( amaranth vegetable in marathi ) ची भाजी चावून खावी.