आदिती तशी हुशार आणि चुणचुणीत मुलगी. पण, काही महिन्यापूर्वी अचानक तिचे वजन कमी व्हायला लागले. सारखे पोटात दुखते अशी तक्रार ती करू लागली. तोंड येणे, गॅसेस होणे यासारखे प्रकारही वारंवार घडू लागले. अखेरीस तिला डॉक्टरांकडे नेले आणइ काही तपासण्यांनंतर डॉक्टरांनी सांगितले की, आदितीला सिलीऍक नावाचा आजार झाला आहे. ह्या आजारात ग्लुटेन ( gluten free diet in marathi ) त नावाचा अन्नघटक जो गव्हामध्ये आढळतो, त्याची ऍलर्जी निर्माण होते.
गहू न पचल्यामुळे आणि पचनसंस्थेच्या आतील आवरणारा (ग्लुटेनमुळे) जखमा झाल्यामुळे वरील लक्षणे दिसून येतात. डॉक्टरांनी आदितीला ग्लुटेनमुक्त आहार ( gluten free diet in marathi ) त घ्यायला सांगितले. या आहार ( gluten free diet in marathi ) त गहू व गव्हाचे पदार्थ पूर्णपणे बंद करायला सांगितले. आहारतज्ज्ञांनी तिला अनेक पर्याय सुचविले. त्यामुळे तीचे वजन सुधारले आणि त्रासही पूर्णपणे बंद झाले.
हल्ली सिलिऍक आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजाराचा पचनसंस्थेवर होणाऱ्या परिणामामुळे इतर अन्न घटकांच्या (लोह, ब 12 जीवनसत्त्व, फोलिक ऍसिड, कॅल्शिअम) शोषणावरदेखील परिणाम होत आहे व पर्यायाने रक्तक्षय (ऍनिमिया), हाडांची ठिसूळता, कुपोषण यांचे प्रमाण वाढत आहे.
ग्लुटेनमुक्त आहार ( gluten free diet in marathi ) म्हणजे काय
ग्लुटेनमुक्त आहार ( gluten free diet in marathi ) त गहू व गव्हाचे पदार्थ, बार्ली, ओट्स, सातू यासारखी धान्ये देखील वर्ज्य करावी लागतात. भारतीयांच्या आहारा( gluten free diet in marathi ) मध्ये गव्हाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे गहू बदं करणे म्हणजे मोठे संकट वाटते. पण, त्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गव्हाच्या पोळी ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यांची भाकरी आहारात घ्यावी. राजगिऱ्याचे थालीपीठ, केळीच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे घावन, डाळीचे धिरडे हे देखील पोळीला पोषक पर्याय ठरतात. आहारात भात (तांदूळ, वरई, राळे) घेता येतो.
हल्ली बाजारात अनेक प्रकारची ग्लुटेन फ्री ( gluten free diet in marathi ) त बिस्कीटे, इतर खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. फूड लेबल्स काळजीपूर्वक वाचून ते पदार्थ घेण्यास हरकत नाही. शिवाय सर्व भाज्या, फळे, कडधान्ये, दूध, दुधाचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ, सुकामेवा, तेलबिया, सोयाबिन व पदार्थ यांचा आहार ( gluten free diet in marathi ) त समावेश करता येतो.
स्वयंपाक करताना गव्हाचे पीठ कशात मिसळले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ गव्हाचे पीठ चाळण्याची चाळणी इतर पीठ चाळण्यास वापरली जाऊ शकते. एका पिठातला चमचा दुसरीकडे वापरला जाऊ शकतो. हे टाळावे.
खालील तक्त्यामध्ये ग्लुटेनमुक्त आहार ( gluten free diet in marathi ) त टाळावयाचे पदार्थ व त्यासाठी पोषक पर्याय दिलेले आहेत.
टाळावयाचे पदार्थ
-पोळी, ब्रेड, बिस्किटे, पुऱ्या, पिझ्जा, तंदूररोटी, रूमाली रोटी, केक, बर्गर, पाव
-नूडल्स्, पास्ता, शेवया, कुरड्या, मॅगी, मॅक्रोनी
-रवा व रव्याचे पदार्थ (उपमा, शिरा, सांजा, साटोरी), दलिया, ओटस्
– वरणफळे, न्युट्रीबार, रेडीमेड सूप्स, काही प्रकारची चॉकलेटस् चायनीज् व हॉटेलमधील भाज्यांची ग्रेव्ही, व्हीटब्रान, सामोसा, पॅटिस, ब्रेड रोल्स व इतर रोल्स व्हीटफ्लेक्स्, सॅलेड ड्रेसिंग, सॉसेस.
ग्लुटेनमुक्त आहार ( gluten free diet in marathi ) : पोषक पर्याय
– ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी
-राजगिऱ्याचे थालीपीठ,
– डाळीच्या पिठाचे धिरडे
– डोसा, उत्तप्पा, ग्लुटेन फ्री ( gluten free diet in marathi ) त बिस्किटे
– तांदळाच्या शेवया, चुरमुरे, उडदाचे व साबुदाण्याचे, बटाट्याचे पापड
– तांदळाचा रवा, सोयाबीनचा रवा, पोहे, वरई, राळे,
– शिंगाड्याचे पीठ
– केळीचे पीठ व त्याचे पदार्थ
– भाज्या फळे कडधान्ये
– दूध व दुधाचे पदार्थ
– कॉर्नफ्लोअर, कॉर्नफ्लेक्स
-बटाटा, रताळी, कंदमुळे, साबुदाणा
– सुकामेवा व तेलबिया
– मासांहारी पदार्थ
– सोयाबीनचे पदार्थ
– ग्लुटेन फ्री ( gluten free diet in marathi ) त असे दर्शविलेले खाद्यपदार्थ