नीळीला बाजारात गुळी म्हणतात. हिची पाने, मुळे व नीळ औषधी आहेत. हे झाड गुजराथेत बरेच होते. ही झाडे कमरेइतकी उंच होतात.
मूत्रविकारावर : नीळींचे चूर्ण लघवी साफ होण्यास वापरतात. लघवी अडते, खर पडते, ह्यास सांद्रमेह म्हणतात. ह्यावर अर्धा चमचा नीळ 4 वेळा दिल्यास लघवीचा रंग नीळीसारखा होतो. नंतर नीळ घेण्याचे सोडल्यास पूर्ववत पांढरा होतो.
शौच विकारावर : निळीने शौचास साफ होते. निळीच्या पानाचा ताजा रस चमचाभर घेतल्याने शौचास साफ होते.
वाढलेल्या प्लिहेवर : तीन चमचे नीळीच्या पानाचा रस मधातून दिल्यास वाढलेली प्लिहा बरी होते.
यकृत वृद्धिवर : यकृत वृद्धिवर निळीच्या पानाचा रस लागू पडतो.
भूकेवर : निळीच्या पानांचा रस घेतला असता भूक चांगली लागते व बरे वाटते.
पोटात पाणी झाल्यास : पोटात पाणी झाल्यास वयोमानाप्रमाणे निळीच्या पानांचा रस 3 ते 6 चमचे तितकाच मध घालून दिल्यास पोट उतरते. अधोमार्गान म्हणजेच शौचास व लघवीस साफ होऊन पोटातील पाणी कमी होते.
लहान मुलांच्या डांग्या खोकल्यावर : लहान मुलांना डांग्या खोकला झाला असता यावर नीळीच्या पानांचा रस 10 थेंब समभाग मधाबरोबर द्यावा. खोकला लगेच बरा होतो. रस शक्य नसल्यास पूड वापरल्याने देखील गुण येतो.
हृदयविकारावर : हृदय धडधडत असेल तर निळीच्या पानांचा रस 4 वेळा समभाग मधातून दिल्याने फायदा होतो. परसाकडे साफ होते. भूक लागते. धडधडणे थांबते.
मूतखड्यावर : मूतखड्यावर नीळेचे पानाचा काढा चांगला लागू पडतो. 20 ग्रॅम नीळीची मूळ अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा करावा व चमचाभर जवखार घालून द्यावा, मूतखडा पडून जाता किंवा मूतखड्यामूळे होणारे विकार बरे होतात.
कुत्र्याच्या विषावर : कुत्र्याच्या विषावर रोज 3 चमचे निळीचा रस समभाग दूध घालून घेतल्यास बाधत नाही.
मुळव्याधीवर : मुळव्याधीवर निळीची पाने कुटून बांधल्यास मूळव्याधीचा मोड पडण्यास मदत होते.
कोणत्याही सूजेवर : सुजेवरती निळीच्या पानांचा रस चोळल्यास सूज कमी होते. अशाप्रकारे नीळ ही गुणकारी औषधी वनस्पती आहे.