Konark Sun Temple : ‘कोणार्क’ (Konark Sun Temple) हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, जे सूर्य मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहे. ओडिशातील कोणार्क हे त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठीही ओळखले जाते. हे मंदिर 12व्या शतकातील राजा नरसिंह देव प्रथम यांनी बांधले होते.
सुमारे 800 वर्षे जुने मंदिर आजही देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही हिवाळ्यात कुठेतरी भेट देण्याचा (फिरण्याचा) विचार करत असाल तर तुम्ही ‘कोणार्क सूर्य’ मंदिराला (Konark Sun Temple) नक्की भेट देऊ शकता.
कोणार्क सूर्य मंदिराच्या मुख्य मंदिराची उंची सुमारे 227 फूट आहे, जी भारतातील सर्व मंदिरांमध्ये सर्वात जास्त आहे. हे भगवान सूर्याच्या रथाच्या रूपात बांधण्यात आले आहे. यात 7 घोडे आणि 24 चाके आहेत. या मंदिराचे नक्षीकाम देखील अतिशय भव्य आहे. या मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी खाली देण्यात आल्या आहेत….
सूर्य मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ कोणती –
येथे सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रथाच्या चाकांवर पडणारे सूर्यकिरण पाहून अचूक वेळ कळू शकते. त्याच्या भव्य संरचनेमुळे, UNESCO ने 1984 मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित केले. हिवाळ्याच्या हंगामात तुम्ही सूर्य मंदिराला भेट देण्याची योजना करू शकता.
अस्तरंग बीच –
याशिवाय तुम्ही येथून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या अस्तरंग बीचलाही भेट देऊ शकता. हा समुद्रकिनारा सूर्यास्ताच्या नेत्रदीपक दृश्यासाठी योग्य आहे. येथे मासळी बाजारही भरवला जातो. येथे तुम्ही विविध प्रकारच्या माशांपासून बनवलेल्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही कोणार्क संग्रहालयाला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला अनेक शिल्पे आणि इतर संस्कृतींचे अवशेष पाहायला मिळतात.
बाहेर फिरायला कधी जायचे –
ऑक्टोबर ते मार्च हा कोणार्कला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या काळात येथे उष्णता नसते. या पाच महिन्यांत तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन सहज करू शकता.
कसे जायचे –
तुम्ही पुरी आणि भुवनेश्वर या दोन्ही ठिकाणांहून रस्त्याने येथे पोहोचू शकता. यासोबतच या दोन्ही शहरांमधून ट्रेनची सुविधाही उपलब्ध आहे. जर तुम्ही विमानाने जात असाल तर भुवनेश्वर विमानतळ जवळ आहे.
The post Konark Sun Temple : गुलाबी थंडीत फिरायला जाण्याचा विचार करताय? तर ‘कोणार्क सूर्य’ मंदिराला नक्की भेट द्या.! appeared first on Dainik Prabhat.