Sunday, March 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

महिलांनो, हार्ट ऍटॅकची लक्षणे ओळखा!

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आज जगभरात हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराच्या झटक्‍याचा धोका कमी असतो. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे. या व्यतिरिक्त, पुष्कळ लोक असेही मानतात क,ी 40 व्या वयाच्या नंतर पुरुषांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि 45 वर्षानंतर स्त्रियांना. मात्र हृदयविकाराचा झटका कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वयात आणि कोणालाही येऊ शकतो, मग कोणी 25 वर्षांचे असो वा 50 चे.

खूप विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असेल आणि आपण उठू आणि 10 पायऱ्याही चालू शकणार नाही, असे वाटत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्‍याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहावे आणि त्वरित डॉक्‍टरांना भेटावे. छातीत दुखणे हे हृदयविकाराचा एक प्रमुख लक्षण आहे, परंतु अमेरिकेच्या क्‍लेव्हलॅंड क्‍लिनिक मेडिकल सेंटरने नुकत्याच केलेल्या संशोधन अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्‍याची अशी अनेक लक्षणे आहेत जी केवळ महिलांमध्येच दिसून येतात.

चला जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत ते…
जेव्हा छातीत दुखणे सहसा हृदयविकाराच्या झटक्‍याशी संबंधित असते तेव्हा क्‍लीव्हलॅंड क्‍लिनिक मेडिकल सेंटर असा दावा करतो की हृदयविकाराचा झटका आल्यास महिलांना मान, जबडा, पाठ, हात असे दुखणे देखील होऊ शकते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. श्वासोच्छवासाच्या समस्या हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे, परंतु अलीकडील एका संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, महिलांमध्ये चक्कर येणे देखील हृदयविकाराच्या झटक्‍याचे लक्षण असू शकते. म्हणून फार सतर्क राहण्याची गरज आहे.

ओटीपोटात दुखणे सहसा प्रत्येकासाठी एक समस्या असते, परंतु स्त्रियांमध्ये, जर ओटीपोटात तीव्र वेदना किंवा असामान्य दबाव असेल तर ते हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत आपण हृदयरोगाशी संबंधित डॉक्‍टरांशीही संपर्क साधावा. शरीरातून घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु हृदयविकाराच्या झटक्‍यातही स्त्रियांना थंड घाम येणे हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे. आपल्यालाही अशीच समस्या असल्यास आपण तत्काळ डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.

Tags: Heart AttackSymptomswomen
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar