लहान मुलं छान गुबगुबीत, जाडं असेल तर छान दिसते असे अनेकांना वाटते. पण, हीच अतिरिक्त जाडी त्याला अनेक विकार ( child asthma attack ) देऊ शकते, असे संशोधन सांगते. आता तर अस्थमा ( child asthma attack ) चाही संबंध जाडीशी जोडला जावू शकतो. कारण, या विषयावर ऑस्ट्रेलिया व इंग्लंड येथील अभ्यासकांनी नुकतेच संशोधन केले आहे.
इंग्लंड, न्यूझीलंड, आर्यलंड येथे मुलांमध्ये अस्थामाचेही प्रमाण जास्त दिसते. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे डॉ. सिमॉन बॉऊलर यांच्याबरोबर डॉ. रिक्वेल गार्नेल यांनी संशोधनात सहभाग घेतला. त्यांनी सुमारे पाच हजार लहान मुलांचे वजन, त्यांना असलेला अस्थमा ( child asthma attack ) याचा अभ्यास केला.
तब्येत चांगली राहण्यासाठी बॉडी मास इंडेक्स योग्य असणे गरजेचे असते. वजन, वय, उंची यांच्या प्रमाणात हा बॉडी मास इंडेक्स काढला जातो. पण, ज्या मुलांचा बॉडी मास इंडेक्स योग्य नव्हता त्यांच्यातील अनेकांमध्ये अस्थमा ही ( child asthma attack ) असल्याचे दिसून आले.
आपल्याकडे मुलं टिव्हीपुढे बसतात, खेळत नाही असा सूर नेहमी ऐकू येतो. पाश्चिमात्य देशात तो सूर तीव्र झाला आहे. मुले दिवसभर टिव्ही, संगणक आदीमुळे जास्त वेळ बसलेले असतात. त्यामुळे त्यांची जाडी वाढत आहे. व आता त्यांच्यात अस्थमा चे ( child asthma attack ) प्रमाणही वाढल्याचे दिसत असल्याचे या संशोधनात पुढे आले.
ऑस्ट्रेलियाचे डॉ. सिमॉन बॉऊलर यांनी याविषयी सांगितले की, अस्थमा वर ( child asthma attack ) कायमस्वरूपी उपचार अजून अवघड आहे. पण, तो होऊ नये यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. त्यामध्ये मुलांची जीवनशैली बदलणे, सुधारणे व वजन मर्यादित राहील हे पाहणे गरजेचे आहे. लहानपणी वजन योग्य असेल तर अनेक आजार नियंत्रित राहू शकतात. अस्थमा ही ( child asthma attack ) नियंत्रणात राहू शकेल. या विषयावर अजून संशोधन होणे गरजेचे असल्याचे डॉ. रिक्वेल गार्नेल यांनी नमूद केले.