Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या, व्हिटॅमिन बी-12ची कमतरता आणि महत्व

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जीवनसत्त्व बी 12 च्या अभावामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होत नाही. त्यामुळे रक्तक्षय (ऍनेमिया) होऊ शकतो. चेतापेशींवर मेएलीनचे आवरण असते. या मेएलीनचे शोषण झाल्याने चेतापेशींच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो व त्यांचे कार्यवहन बिघडते.

जीवनसत्त्व बी 12 ला सामान्यपणे ऊर्जा जीवनसत्त्व देखील म्हणतात. मानवी शरीराकरिता हे पॉवर हाऊस असते, जे डीएनए, चेता पेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात मदत करते. मेंदू, रोग प्रतिकार क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते.

15 टक्क्‌यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता असते आणि त्यापैकी बहुसंख्य शाकाहारी असतात. 50 वर्ष वयोगटापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती सेलीयाकग्रस्त असतात किंवा त्यांना इतर पचनविषयक समस्या असतात. त्यामुळे जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता बळावण्याची शक्‍यता अधिक असते.

मानवी शरीर हे जीवनसत्त्व बी 12 ची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे ते अंडी, मांस, कवचजन्य मासे, डेअरी किंवा इतर पुरकांमधून मिळवता येते. हे जीवनसत्त्व बराच काळ शरीरात साठवून ठेवता येणारे नसल्याने ठराविक कालावधीनंतर बी समृद्ध आहाराचे सेवन करावे.

जीवनसत्त्व बी 12 चा अभाव निर्माण होण्यामागची काही कारणे

ऍट्रोफिक गॅस्स्ट्रायटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होणे गंभीर स्वरूपाचा रक्ताक्षय, रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आजार जसे की, ग्रेव्ज डीसीज किंवा लुपसमुळे जीवनसत्त्व बी चे शोषण झाल्याने अभाव क्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोटया आतडयाच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणा.

या परिस्थितीतील इतर कारणांवर प्रकाश टाकताना असे समजते की, वाढत्या वयासोबत जीवनसत्त्व बी 12 शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वेट लॉस किंवा पोटाची इतर एखादी शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन बसते. मद्यपान मोठया प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ ऍसीड कमी करणारे औषध घेत असल्यास, जीवनसत्त्व बी 12 शोषण्यात शरीराला अडथळे येतात. जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता शाकाहारी व्यक्तींमध्ये बहुतांशी पाहायला मिळते.

आश्‍चर्याची बाब म्हणजे, लिंग-आधारे केलेल्या विश्‍लेषणात समजते की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता अधिक दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत महिला वर्ग पूरक आहार नीट घेत असल्याने त्यांचे शरीर जीवनसत्त्व बी 12 ची पातळी राखते.

एका आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेला अधोरेखित करताना असे सांगता येते की, अशा प्रकरणात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील बी 12 अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्‍टर सहज निदान करू शकतात. पूरक किंवा इंजेक्‍शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्त्व बी कमतरता धोका व संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.

एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बी 12 जीवनसत्त्वाचे पूरक सेवन करण्याचा सल्ला आहे. या जीवनसत्त्वांच्या सेवनाचे प्रमाण हे वयानुरूप निराळे असू शकते.

बी 12 च्या अभावाचा उपचार किंवा ऍनेमियात असलेली कमतरता स्थितीनुसार उपाय नेमता येतात. डॉक्‍टर यावर इलाज म्हणून इंजेक्‍शन, टॅब्लेट आणि पूरक देतात. बऱ्याच प्रकरणात लक्षणे बरी झाल्याने अधिक तपासणीची आवश्‍यकता राहत नाही.

डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार जीवनसत्त्वाचे प्रमाण नियंत्रणात आहे, याची खातरजमा वार्षिक रक्त तपासणी केल्यास समजू शकते.

खालील तक्त्‌यामध्ये जीवनसत्त्व बी सेवनाचे प्रमाण मायक्रोग्राम (एमसीजी) मध्ये देण्यात आले आहे.

अर्भक ते वय वर्ष 6 महिने : 0.4 एमसीजी
शिशू वय वर्ष 7-12 महिने : 0.5 एमसीजी
बालके वय वर्ष 1-3 : 0.9 एमसीजी
बालके वय वर्ष 4-8 : 1.2 एमसीजी
बालके वय वर्ष 9-13 : 1.8 एमसीजी
किशोरवयीन वय वर्ष 14-18 : 2.4 एमसीजी
(गर्भवती असल्यास दरदिवशी 2.6 एमसीजी
बाळाला स्तनपान देत असल्यास दरदिवशी 2.8 एमसीजी)
प्रौढ (18 आणि त्यावरील) : 2.6 एमसीजी
(गर्भवती असल्यास दरदिवशी 2.6 एमसीजी
बाळाला स्तनपान देत असल्यास दरदिवशी 2.8 एमसीजी)

Tags: aarogya jagar 2021aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsice benefits for skinindraja bhakareinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathiNews healthNews lifestyletopnewsWATERWeight loss
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar