मार्जरी म्हणजे मांजर. आपल्या सर्वांच्या माहितीचा प्राणी. आपल्या घरातील प्राणीसुद्धा आपल्याला योगाचे धडे देतात. योगी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने आपल्या आसपासच्या जगाचे निरीक्षण करीत असतात आणि त्यातून नवनवीन कल्पना आत्मसात करत असतात. मांजराला आपले शरीर ताणताना आपण अनेकदा पाहिले असेल. मांजराच्या या शरीर ताणण्याच्या कृतीतूनच मार्जरी आसन तयार झाले आहे.
मार्जारी आसन करण्याची कृती – ( Marjariasana , The Cat Pose )
– मांजरीप्रमाणे चार पायांवर- आपले दोन्ही गुडघे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने उभे राहा. आपल्या शरीराचे अशा प्रकारे टेबल बनवा की तुमची पाठ म्हणजे टेबलाची वरची बाजू (टेबल टॉप) आणि तुमचे हात व पाय हे टेबलाचे पाय होतील.
प तुमचे हात जमिनीला लंबरूप ठेवा, हात हे खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजेत आणि हाताचे तळवे हे जमिनीवर सपाट असले पाहिजेत. दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीइतके अंतर ठेवावे. दृष्टी समोर सरळ ठेवावी.
– जसा तुम्ही श्वास आत घेऊ लागता, तशी हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे, तुमच्या नाभीला खालच्या दिशेला ढकलावे आणि माकडहाडाला वर उचलावे.
– या मांजरीच्या पवित्र्यात थोडा वेळ राहा आणि दीर्घ श्वास घ्या.
-आता केलेल्या स्थितीच्या अगदी विरुद्ध स्थिती करा. जसजसे तुम्ही श्वास सोडू लागता तसतसे हनुवटीला छातीकडे आणा आणि पाठीची तुमच्या क्षमतेनुसार कमान करा; नितंबांना सैल सोडा. या स्थितीत काही सेकंद राहा आणि मग तुमच्या पहिल्या टेबलच्या स्थितीत परत या.
या योगासनातून बाहेर येण्यापूर्वी असे पाच किंवा सहा वेळा करा. तुम्ही ही हालचाल सावकाशपणे आणि डौलदारपणे केल्यास अधिक परिणामकारक आणि लाभदायक होईल… ( Marjariasana , The Cat Pose )
मार्जरी आसनाचे फायदे
– पाठीचा कणा लवचिकता बनतो.
– मनगटे, खांद्यांना बळकटी येते.
– पचनेन्द्रीयांना मालिश होते
-पचनक्रिया सुधारते.
– उदर सुडौल बनते.
– मन शांत बनते.
-रक्ताभिसरण सुधारते.
जर पाठ आणि मानेचा काही त्रास असेल, तर मार्जरी आसन करू नये.( Marjariasana , The Cat Pose )