पुणे – मानवजात बालकाचे प्रमुख अन्न हे मातेचे दुधच आहे. मातेच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेच शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यासही मदत होते. स्तनपान हा पोषणाचा एक स्रोत आहे. नव्हे यापेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणून बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करणे महत्वाचे आहे.
तेचे दुध हे नवजात बालकांसाठी एक प्रकारचे अमृतच असते. मातेच्या दुधाशिवाय अन्य कोणताही आहार नवजात शिशुंसाठी योग्य नसतो. पहिल्या 6 महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान करणे गरजेचे आहे. नवजात बालके दगावण्याचा धोका हा वयाच्या पहिल्या महिन्यापासून ते पहिल्या वर्षापर्यंत अधिक असतो. या काळामध्ये स्तनपानामुळे हा धोका कमी होतो.
स्तनपानामुळे बालकाचे दमा, अतिसार, कुपोषण. पोटाचे विकार, रक्त कैन्सर होण्यासून रक्षण होते. मातेच्या दुधामध्ये कैन्सरपासून लढण्याचे अनेक घटक असतात. त्यामुळे स्तनपान केलेल्या बालकाला भविष्यात कैन्सर होण्याची संभावना कमी होते.
नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व
स्तनपानामुळे बालक आणि माता या दोहोंस विशेष लाभ होत असतात. स्तनपान हे पोषणाचा एक स्रोत म्हणण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणे हिताचे ठरते.
स्तनपानातून मातेस होणारे लाभ
पस्तनपान करवणा-या नवमातांचे वजन नंतर लवकर कमी होते.
पप्रसुतीनंतरचा तणाव आणि रक्तस्त्राव कमी करायला त्यामुळे मदत होते.
पस्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी करता येते.
पबाळाच्या संगोपनाचा काळ जितका अधिक तेवढा धोका कमी होतो.
पआई आणि बाळ यांच्यात भावनिक नाते निर्माण होते.
किती काळापर्यंत स्तनपान करवावे ?
पहिले सहा महिने केवळ स्तनपानंच करवावे आणि त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. लक्षात ठेवा किमान पहिल्या 6 महिन्यापर्यंत बालकास केवळ मातेचे दुधच द्यावे. पाणी, फळांचा रस किंवा अन्य द्रव्ये 6 महिन्यापर्यंत देऊ नयेत.
सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणे चांगले असते, कारण त्यामुळे बाळाच्या पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळते. मातेचे दुध पचायला सोपे असते त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. याने बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्तीही वाढते. तसेच मातेच्या दुधामध्ये अनेक पोषक घटकद्रव्ये असतात. त्यामुळे बालकाचा शारीरीक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यास स्तनपानामुळे मदत होते. स्तन्य हे रोगप्रतिकारक घटकांनी युक्त असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होते. शिवाय त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
तसेच बाळाचे साथीचे रोग, दमा आणि कानाच्या संक्रमण, ऍलर्जीसारख्या अनेक रोगांपासून रक्षण होते. स्तनपान करवलेल्या बाळांना नंतरच्या वयात लठ्ठपणा येत नाही. याचे कारण असे की त्यांना भूक लागते तेव्हाच ते अन्न घेतात त्यामुळे पहिल्यापासूनच अतिरिक्त वजन वाढण्याची शक्यता नसते. बालवयात होणारा रक्तपेशीचा कर्करोग, टाईप-1 मधुमेह आणि नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाब टाळण्याशी देखील स्तनपानाचा संबंध आहे.
स्तनपानामुळे बाळाचा बौद्धिक विकास होतो. मेंदू तल्लख बनतो, स्मरणशक्ती वाढते. म्हणून नवजात बालकांस पहिल्या 6 महिन्यापर्यंत केवळ मातेचे दुधच द्यावे.