पुणे – संस्कृतमध्ये निल्पुष्पी अथवा कृष्णबीज म्हणजेच काळा दाणा होय. मूळचे हे औषध अरबस्थानातून इकडे आले आहे. याचा आयुर्वेदात उल्लेख नाही. हे एक उत्तम औषध आहे. याला हिंदीत काला दाना असे म्हणतात. याच्या वेली असून त्या बागाईत जमिनीत पावसाळ्यात फार होतात.
भाद्रपद महिन्यात याच्या शेंगा सुकतात, ह्यातील दाण्यांना काळादाणा असे म्हटले जाते. याचे ओषधी उपयोग असे, सूज, उदररोग, ज्वर, कृमी, प्लीहा, मस्तकशूळ, उदावर्तवायु व अजीर्ण आणि उदररोग, ज्वर, कृमी, प्लीहा, मस्तकशूळ, उदावर्तवायू व अजीर्ण इत्यादी विकारांवर चांगला उपयुक्त आहे.
जुलाबावर – जुलाबाकरिता काळदाणा 25 ग्रॅम, सैंधव 25 ग्रॅम, सुंठ 35 ग्रॅम यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व दर वेळी अडीच ग्रॅमपासून पाच ग्रॅमपर्यंत कोमट पाण्याबरोबर घ्यावे. काळादाणा हे जुलाबाचे मोठे औषध आहे. ते वापरताना सावधगिरी बाळगावी. जुलाब जास्त होऊ लागल्यास तूप-भात दिला असता जुलाब होणे बंद होते. जुलाबाचे सौम्य औषध आहे.कोमट करून वापरावे.
शरीरावर सूज आली असता – अंगावर सूज आली असता काळादाण्याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
आमवात, सांधेदुखी वर – आमवात, सांधेदुखी यावरही काळादाणा व अतिविष याचे समचूर्ण कोमट पाण्याबरोबर घेतले असता चांगला गुण येतो.
पित्तासाठी – पित्तासाठी हे चांगले रेचक आहे. पित्ताची तीव्रता कमी होते.
यकृताच्या विकारावर – काळादाण्याचे चूर्ण हे कोमट पाण्यातून घ्यावे जे यकृताच्या विकारावर उत्तम समजले जाते. गुजराथ, सौराष्ट्र, कच्छ येथे काळा दाण्याला “मसरडाचे वेल ‘असे म्हणतात. अशाप्रकारे काळा दाणा हा अतिशय गुणकारी असतो.