Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Kidney Cancer बाबत काळजी घ्या! जाणून घ्या कुणाला होऊ शकतो हा कर्करोग

by
July 4, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Kidney Cancer बाबत काळजी घ्या! जाणून घ्या कुणाला होऊ शकतो हा कर्करोग
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

इतके दिवस आपण सगळीकडे मधुमेह, हृदयविकार उच्च रक्तदाब या गोष्टींचे प्रमाण वाढत आहे पण काही वर्षांमध्ये कॅन्सरचे प्रमाणही बरेच वाढलेले दर्शनास येते आणि त्यामध्ये आता एक नवीन कॅन्सरचा नवीन प्रकार ऐकायला मिळत आहे, तो म्हणजे किडनी कॅन्सर. जगभरात आणि खास करून युरोप आणि अमेरिका खंडातील देशांमध्ये किडनी कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. पण भारतातही किडनी कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.

किडनी कॅन्सर म्हणजे नक्की काय?
किडनी कॅन्सरमध्ये आपल्या किडनीमध्ये ट्यूमर म्हणजेच गाठ होणे. आपल्या शरीरात दोन किडनी असतात, ज्या आपल्या शरीरातील घाण लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत करतात. किडनी कॅन्सरमध्ये याच किडन्यांमध्ये गाठ म्हणजेच ट्यूमर होतो. या गाठी एक किंवा अनेक आणि दोन्ही किडन्यांमध्येही असू शकततात

किडनी कॅन्सरची लक्षणे
खरेतर इतर कॅन्सर प्रमाणेच किडनी कॅन्सरची लक्षणेपण लवकर लक्षात येत नाहीत. पण तरी काही लक्षणे आहेत जसे की आपल्या लघवी मधून रक्‍त पडणे किंवा किडनीच्या ठिकाणी दुखणे, आपले वजन आपोआप कमी होणे.

किडनी कॅन्सर होण्याची कारणे
बाकीच्या कॅन्सर प्रमाणेच किडनी कॅन्सरचही विशेष असे काही कारण नाही. पण जी माणसे जास्त धूम्रपान करतात किंवा ज्यांना हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यामध्ये किडनी कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते तसेच हा एक अनुवंशिक आजारही आहे.

किडनी कॅन्सरची तपासणी
शक्‍यतो किडनी कॅन्सरची लक्षणे चटकन दिसून येत नाहीत त्यामुळे त्याचा तपास लागणे कठीण असते. बऱ्याच वेळा किडनी कॅन्सरचा तपास योगायोगानेच लागतो. म्हणजे रुग्ण पित्ताशय किंवा किडनी स्टोनचा त्रास होत असल्यामुळे तपासणीसाठी गेले असता किडनीमध्ये गाठ असेल तर ती एमआरआयमध्ये दिसून येते .

किडनी कॅन्सरवरील उपचार-
किडनी कॅन्सर साठी ट्यूमर म्हणजेच गाठ ही जर दोन-तीन सेंटीमीटरची असेल तर ती लेप्रोस्कोपीने म्हणजे दुर्बिणीच्या साह्याने काढू शकतो. पण ट्यूमर मोठा असेल तर ऑपरेशन करून काढावी लागते. कधी कधी ट्यूमर किडनीच्या आजूबाजूलाही पसरलेला असतो तेव्हा कॅन्सर पूर्णपणे बरा होणे कठीण असते. एखादा रुग्ण लॅप्रोस्कोपी किंवा ऑपरेशन यामुळे किती प्रमाणात बरा होईल हे रुग्णाच्या आरोग्यावरही अवलंबून असते. जर एखाद्या रुग्ण सुदृढ असेल तर तो पूर्णपणे बरा होतो पण पण एखाद्या रुग्णाला उच्च रक्तदाब हृदयविकार किंवा आणखी काही आजार असतील तर ते पूर्णपणे बरे होणे कठीण असते.आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि सदृढ रहा जेणेकरून कॅन्सर सारखे दुर्धर रोग आपल्याला होणार नाहीत.

शितल नेवासे, पुणे

The post Kidney Cancer बाबत काळजी घ्या! जाणून घ्या कुणाला होऊ शकतो हा कर्करोग appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar