[[{“value”:”
Khadakwasla Vidhan Sabha | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू झाली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके आघाडीवर आहेत. सचिन दोडके यांना ४७७६ मतं तर भीमराव तापकीर यांना ४१७१ मतं मिळाली आहेत. सचिन दोडके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दरम्यान, खडकवासलात सचिन दोडके (राष्ट्रवादी – एसपी), भीमराव तापकिर (भाजप), मयूरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली.
खडकवासला विधानसभा मतदार संघात तिसऱ्या फेरीत भीमराव तापकीर यांनी आघाडी घेतली आहे. तापकीर हे 1200 मतांनी आघाडीवर आहेत.
– भीमराव तापकीर – 16959
– सचिन दोडके – 15776
– मयुरेश वांजळे – 5255
The post Khadakwasla Vidhan Sabha | खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर यांची आघाडी appeared first on Dainik Prabhat.
“}]]
