kedarnath dham – अनेकांचे चार धाम यात्रा (Char Dham Yatra 2023) करण्याचे स्वप्न असते. हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात स्थापित असलेली चार धाम म्हणजे गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ.
पूर्वीच्या काळी लोक चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) गेले की त्यांची परत येण्याची शक्यता खूपच कमी असे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वीच्या तुलनेत चारधाम यात्रा करणे खूप सोपे झाले.
याचे कारण एक तर वाहनांची सोय चांगली झाली आहे. आणि अगदी मंदिराजवळ घेऊन जाणारी वाहने आणि इतर सोयी असल्याने ही यात्रा करणे सुलभ बनत गेले. त्यामुळेच दरवर्षी या यात्रेची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते.
25 एप्रिलपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेचे दरवाजे नोव्हेंबरमध्ये 6 महिन्यांसाठी बंद होणार आहेत. येत्या 14 नोव्हेंबरला गंगोत्री, 15 नोव्हेंबरला यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत. तर 18 नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत.
दरम्यान, मंदिर बंद होणार असले तरीही काही भाविकांना केदारनाथ मंदिरात (kedarnath dham) जायचे आहे. पण इतक्या कमी वेळात मंदिरात कसे पोहोचायचे हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही माहिती शेअर करणार आहोत जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
रस्त्याने केदारनाथ मंदिरात कसे जायचे?
केदारनाथ मंदिराचे (kedarnath dham) दरवाजे बंद होण्यासाठी कमी वेळ आहे, त्यामुळे तुम्ही बस किंवा ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आधी कारने ऋषिकेशला जावे लागेल, तिथे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पहिल्या दिवशी गुप्तकाशीला पोहोचावे लागेल. दुसऱ्या दिवशी तुम्ही गुप्तकाशीहून आरामात सोनप्रयागला पोहोचू शकता,
त्यानंतर सोनप्रयागहून गोरीकुंडला पोहोचू शकता आणि केदारनाथचा (kedarnath dham) प्रवास सुरू करू शकता. प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला केदारनाथ मंदिरात पोहोचावे लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला कसे जाल –
जर तुम्हाला केदारनाथ धामला खूप कमी वेळात पोहोचायचे असेल तर तुम्ही हेलिकॉप्टरच्या मदतीने सहज भेट देऊ शकता. तुम्ही IRCTC द्वारे हेलिकॉप्टर बुक करू शकता. या यात्रेसाठी भाविकांना उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर कमी वेळात फाटा हेलिपॅडवरून केदारनाथ धामला जाता येते. ज्यासाठी प्रति व्यक्ती 5000 ते 6000 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
विमानाने केदारनाथला जा –
केदारनाथ धामला जाण्यासाठी विमानानेही त्वरीत पोहोचता येते. तुम्ही दिल्लीहून असाल तर विमानाने डेहराडूनच्या जॉली ग्रेट विमानतळावर पोहोचा. तिथून टॅक्सी बुक करा आणि सोनप्रयाग गाठा. सोनप्रयागमध्ये रात्री विश्रांती घेतल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी गोरीकुंडला पोहोचू शकता आणि प्रवासाला सुरुवात करू शकता.
जास्त सामान घेऊन जाऊ नका –
जर तुम्हाला केदारनाथ धाम मंदिरात लवकर पोहोचायचे असेल, तर तुमच्यासोबत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सॅचेल बॅगमध्ये अत्यंत महत्त्वाच्या वस्तू ठेवा. लहान बॅग नेण्यास सोपी आहे, त्यामुळे प्रवास पूर्ण करताना थकवा येणार नाही आणि आरामात प्रवास पूर्ण करू शकाल.
The post kedarnath dham : ‘या’ दिवशी बंद होणार केदारनाथ धामचे दरवाजे; झटपट दर्शन घेण्यासाठी अशी करा ट्रिप प्लॅन ! appeared first on Dainik Prabhat.