[[{“value”:”
Karishma Kapoor : फॅशन कोणासाठी थांबत नाही आणि कपूर घराण्याची मुलगी आणि पहिली सुपरस्टार करिश्मा कपूर हे चांगल्या प्रकारे समजते. अभिनेत्री काळाबरोबर तिची शैली बदलत राहते. करिश्मा दररोज वेगवेगळे पोशाख घालून नवीन लूकमध्ये दिसते.
अलीकडेच पुन्हा एकदा करिश्माने पूर्णपणे नवीन लूक स्वीकारला आहे. या अभिनेत्रीने काळा आणि पांढरा कोट-पँट घालून तिचा बॉसी लूक दाखवला आहे. तिने हा ब्लेझर लूक आत्मविश्वासाने परिधान केला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य सर्वांना मोहित करत आहे.
करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या बॉसी लूकचा फोटो शेअर केला आहे. तिच्या बॉसी लूकसाठी, करिश्माने समोर बटणे असलेला पांढरा शर्ट घातला होता. लूक अधिकच आकर्षक बनवण्यासाठी अभिनेत्रीने शर्ट तळाशी व्यवस्थित गुंडाळला असून यासोबत, अभिनेत्रीने पूर्ण बाह्यांचा, किंचित सैल फिटिंगचा स्टायलिश काळा कोट परिधान केला आहे.
करिश्माच्या काळ्या कोटला सोनेरी बटणे होती, ज्यामुळे तिचा फॉर्मल लूक पार्टीसाठीही परिपूर्ण होता. अभिनेत्रीने पांढऱ्या शर्ट आणि काळ्या कोटसह टेलर-फिटिंग आणि हाय-फिटिंग काळी पँट घालणे पसंत केले. तिचा बॉसी लूक पूर्ण करण्यासाठी, करिश्माने बॅजने सजवलेला पांढरा टाय घातला होता.
करिश्माच्या पोशाखाप्रमाणेच, तिने ज्या पद्धतीने ते स्टाइल केरी केले आहे ते देखील अद्भुत होते. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप निवडला असून डोळे उजळवण्यासाठी तिने जाड काजळ घातली होती. विशेष म्हणजे करिश्माने या कोट-पँट लूकसोबत कोणतेही अॅक्सेसरीज घातले नाहीत.
करिश्माचा हा लूक असा आहे की तुम्ही तो तुमच्या ऑफिसमध्ये सहज स्टाईल करू शकता. अभिनेत्रीचा हा बॉसी अंदाज सर्वांनाच आवडला असून, फॅन्स देखील फोटोला लाईक्सच्या माध्यमातून प्रेम देत आहेत.
करिश्मा कपूर १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असून, तिने अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.
कपूर कुटुंबाचा एक भाग असलेल्या तिने किशोरावस्थेतच ‘प्रेम कैदी’ (१९९१) या मध्यम यशस्वी चित्रपटातून मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर, अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ज्यात ‘जिगर’ (१९९२) आणि ‘अनारी’ (१९९३), ‘राजा बाबू’ (१९९४), ‘ अंदाज अपना अपना’ (१९९४), ‘कुली नंबर १’ (१९९५) आणि ‘साजन चले ससुराल’ (१९९६) आणि ‘ जीत ‘ या विनोदी चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमांसोबतच टीव्ही रियालिटी शो मध्ये देखील आपली जादू दाखवली आहे.
The post Karishma Kapoor : बॉसी लूकमध्ये ‘करिश्मा कपूर’ चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स; ऑफीससाठी आहे एकदम परफेक्ट लूक ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]