Thursday, November 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Karanji Recipe: दिवाळीच्या फराळात यंदा बनवा नारळ आणि ड्रायफ्रूट्सची खुसखुशीत करंजी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल!

by
November 2, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Karanji Recipe: दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे आणि करंजी अशा पारंपरिक पदार्थांशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण वाटतो. त्यातही करंजीला विशेष महत्त्व आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून गोडसर सारण असलेली करंजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. काही जणांना करंजी बनवणं अवघड वाटतं. मात्र, योग्य साहित्य आणि सोपी पद्धत वापरली तर घरच्या घरी स्वादिष्ट करंजी तयार करता येते.

यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर नारळ आणि ड्रायफ्रूट्सची ही रेसिपी नक्की ट्राय करा. या करंजीमध्ये खोबरं, बदाम, काजू, मनुके आणि वेलची यांचा छान स्वाद मिळतो. चला तर जाणून घेऊया ही खुसखुशीत करंजी बनवण्याची सोपी पद्धत.

करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

करंजीच्या बाहेरील आवरणासाठी आणि आतील सारणासाठी वेगवेगळं साहित्य लागेल.

– २५० ग्रॅम मैदा
– १५० ग्रॅम किसलेलं खोबरं
– १५० मिली दूध
– अर्धा टीस्पून पांढरे तीळ
– बदाम आणि काजू
– मनुके
– अर्धा टीस्पून वेलची पावडर
– ४ टीस्पून पिठीसाखर
– १ टीस्पून तूप
– अर्धा टीस्पून किसलेलं जायफळ
– ६० मिली तूप
– पाव टीस्पून मीठ
– तळण्यासाठी तेल किंवा तूप

करंजीचं सारण कसं तयार करायचं?

सर्वप्रथम एका जाड बुडाच्या कढईत थोडं तूप गरम करा. त्यात किसलेलं खोबरं घालून मंद आचेवर हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. खोबरं भाजताना सतत हलवत राहा, जेणेकरून ते करपणार नाही. भाजलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

आता त्याच कढईत पांढरे तीळ घालून हलके भाजून घ्या. त्यानंतर बदाम आणि काजू मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. एका भांड्यात भाजलेलं खोबरं, तीळ, बदाम-काजूची पूड आणि मनुके एकत्र करा. त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि जायफळ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. अशा प्रकारे करंजीसाठी चविष्ट सारण तयार होईल.

करंजीचं पीठ कसं मळायचं?

आता एका भांड्यात मैदा आणि मीठ घ्या. त्यात गरम केलेलं तूप घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर थोडं थोडं दूध घालत पीठ मळून घ्या. करंजीसाठी पीठ घट्ट असणं आवश्यक आहे. पीठ मळून झाल्यानंतर ते १५ ते २० मिनिटं झाकून बाजूला ठेवा. त्यामुळे पीठ लाटायला सोपं जाईल.

करंजीला आकार कसा द्यायचा?

पीठाचे समान आकाराचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याची साधारण पाच इंच आकाराची पोळी लाटून घ्या. पोळीच्या एका बाजूला तयार केलेलं नारळ आणि ड्रायफ्रूट्सचं सारण भरा. पोळीच्या कडांना थोडं पाणी लावा आणि अर्धगोलाकार आकारात दुमडून घ्या. त्यानंतर कडा व्यवस्थित दाबून बंद करा. काट्याच्या मदतीने कडांवर हलक्या खुणा करा. करंजीच्या कडा घट्ट बंद असणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तळताना करंजी उघडून सारण बाहेर येऊ शकतं.

सोनेरी आणि खुसखुशीत करंजी तळून घ्या

आता कढईत तेल किंवा तूप गरम करा. तेल खूप गरम होणार नाही याची काळजी घ्या. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. करंज्या तळताना त्यांना हळूवार उलटून घ्या, जेणेकरून दोन्ही बाजूंनी छान रंग येईल. तळलेल्या करंज्या टिश्यू पेपरवर काढा आणि थंड होऊ द्या.

अशा प्रकारे तुमची नारळ आणि ड्रायफ्रूट्सची खुसखुशीत करंजी तयार आहे. दिवाळीच्या फराळात ही करंजी पाहुण्यांना नक्कीच आवडेल. एकदा ही रेसिपी करून पाहिल्यानंतर घरातील प्रत्येक जण तुम्हाला करंजीची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही!

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar