कलिंगड हे मूळचे आफ्रिकेचे. उन्हाळ्यात तर क्षुधा शमवणारे फळ आहे. हे फळ आकाराने गोल, लांबट गोल आणि वजनाने एक-दीड किलोपासून दहा-बारा किलो इतके मोठे असते. या फळाच्या आतील गर लाल रंगाचा असतो. हा गर खाण्यास अत्यंत मधुर असतो. या गरामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.( watermelon benefits )
गुणधर्म- कलिंगड मधुर, मूत्रगामी, शीतकारक, बलवर्धक, तृप्तिकारक, पौष्टिक व पित्तहारक असते
घटक- पाणी 95.7 टक्के, प्रोटीन 0.1 टक्के, चरबी 0.2टक्के, कार्बोदित पदार्थ 3.8 टक्के कॅल्शियम 0.1 टक्के, फॉस्फरस 0.01 टक्के, लोह 100 ग्रॅम, नियासिन 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “बी’ 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “इ’ 100 ग्रॅम.
औषधी उपयोग- कलिंगडाच्या फोडी खाल्ल्या तरी भरपूर रस पोटात जातो. रसाच्या स्वरूपात सेवन केल्यास शरीराला अधिक पोषक घटक मिळू शकतात. ( watermelon benefits )
औषधी उपयोग- शारीरिक व मानसिक थंडाव्यासाठी व मनाच्या स्थिरतेसाठी कलिंगडाच्या रस चांगला. शरीरातील नवनिर्मितीच्या क्रियेला कलिंगड रसाच्या सेवनाने गती प्राप्त होते. पोटाच्या अनेक व्याधींवर कलिंगडाचा रस उपयुक्त असतो.
पोटातील दाह कमी होण्यासही उपयुक्त असतो. या फळात मूत्रगामी गुण असल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगड रस गुणकारी आहे. ( watermelon benefits )