चुकीच्या जीवनशैलीमुळे 100 पैकी 20 टक्के रुग्णांना तणावामुळे होतेय काचबिंदूच्या रुग्णसंख्येत वाढ
बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वाढणारा ताण हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. काचबिंदूसारख्या आजाराला देखील तणाव कारणीभूत आहे. 25 ते 50 वर्षे वयोगटातील 100 रुग्णांपैकी 20 टक्के रुग्णांना तणावामुळे काचबिंदू (ग्लुकोमा) सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे.
काचबिंदू हा डोळ्यातील द्रव पदार्थ वाहून जाण्याच्या रचनेच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे किंवा ती चुकीची तयार झाल्यामुळे डोळ्याच्या अंतर्भागातील दाब वाढल्याने निर्माण झालेला आजार आहे. वेळेत उपचार न केल्यास डोळ्याच्या अंतर्भागातील वाढलेला (आयओपी) नेत्रमज्जा (ऑप्टिक नर्व्ह) आणि नेत्रपटलात तंतू (रेटिनल फायबर) यांना हानी निर्माण करतो आणि त्यातून वाढत जाणारे कायमस्वरूपी अंधत्व निर्माण होऊ शकते. डोळ्यांमध्ये ऍक्वस ह्युमर नावाचा एक द्रव पदार्थ नेहमीच तयार होत असतो. हा द्रवपदार्थ डोळ्यातील काही भागांना वंगण देण्याचे काम करत असतो.
द्रवपदार्थ रक्तवाहिन्यांत शोषून घेतला जात असतो. याचे उत्पादन आणि तो शोषला जाणे यांमध्ये योग्य समतोल राखला गेला जातो. या द्रावामुळे डोळ्यावर जो दाब निर्माण होत असतो त्याला इंट्राओक्युलर प्रेशर असे म्हणतात. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, निद्रानाश, व्यस्त जीवनशैली आणि खराब पोषण यामुळे ताण-तणावग्रस्त काचबिंदू उद्भवू शकतात कारण इंट्राओक्युलर प्रेशर (आयओपी) म्हणजे डोळ्याच्या आत द्रव दाब रुग्णाच्या तणावामुळे निर्णाण होतो.
अलीकडच्या काळात काचबिंदूच्या रुग्णांमध्ये 2% वाढ झाली आहे. 100 प्रकरणांपैकी 3 रुग्णांना प्राथमिक ओपन-अँगलचा काचबिंदू (तीव्र काचबिंदू) आणि 0.3% टक्के रुग्णांमध्ये क्लोज अँगलचा काचबिंदू आहेत. आनुवंशिकता, वय आणि तणाव हे घटक काचबिंदूला आमंत्रित करतात. आज, रुग्णालयाला भेट देणाऱ्या रुग्णांना काचबिंदूची लक्षणे दिसून येत आहेत तसेच त्यांच्या डोळ्याच्या अंतर्भागातील दाब वाढले आहेत.
जीवनपद्धतीत अचूक बदल करणे हे सर्वांगीण आरोग्याबरोबरच काचबिंदूसारख्या आजारात निश्चितच उपयुक्त आहे. झोप, व्यायाम, फळे, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश, नैसर्गिक जीवनसत्वांचा समावेश, ग्रीन टी चे सेवन तसेच धुम्रपान, दारू, तंबाखू आदी व्यसनांमुळे डोळ्यांच्या शिरेचा नाश करते. त्यामुळे कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. मानसिक ताणतणावाचा डोळ्यांच्या शिरेच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो.
– डॉ हेमंत तोडकर