[[{“value”:”
कामाच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी व्यक्ती आठ तास काम करतो, त्या ठिकाणी गोंगाट किंवा आवाजाची पातळी ही जास्तीत जास्त 85 डेसिबल असावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे. मात्र पृथ्वीच्या पाठीवर अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या ठिकाणी कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना अतिशय गोंधळात किंवा गोंगाटाच्या परिस्थितीत काम करावे लागते. अश्या कोणत्या नोकऱ्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
1) ट्रक ड्रायव्हर – 25 डेसिबल
ट्रक ड्रायव्हर यांच्या कानावर सतत आवाज पडत असतो. त्यांच्या ट्रकच्या इंजिनाचे अनेक भाग काम करत असल्यामुळे सतत आवाज येत असतो .ही आवाजाची पातळी सरासरी 25 डेसिबल इथपर्यंत असते. जर का रस्त्यांची स्थिती खराब असेल किंवा रस्ते अरुंद असतील ट्रॅफिक जाम असेल तर हा आवाज वाढतो.
2) रेल्वे कामगार 75 डेसिबल
रेल्वे रुळांचे काम तसेच इतर बांधकाम आणि देखभालीचे काम करणाऱ्या कामगारांना रोज 75 ते 90 डेसिबल आवाजाच्या पातळीला सामोरे जावे लागते. काही वेळा तर जेव्हा जवळून ट्रेन जाते तेव्हा ही आवाजाची पातळी 130 ते 140 डेसिबल पर्यंत पोहोचलेली असते.
3) हेलिकॉप्टरचा पायलट
पायलट साठी एअर प्रोटेक्शन उपकरणे ही बंधनकारक असतात. त्याखेरीज जमिनीशी संवाद साधण्यासाठी त्यांना इयरफोन घालणे आवश्यक असते. परंतु ते नसतील तर त्यांना साधारण 97 डेसिबल पर्यंतच्या आवाजाच्या पातळीला सामोरे जावे लागते.
4) धातूकाम करणारे किंवा लोहार काम करणारे कारागीर
हे जवळपास 100 डेसिबल आवाजाच्या पातळीला सतत सामोरे जात असतात. त्यात फारसा कुठलाही बदल होत नाही.
5) कचरा गोळा करणारे
कचऱ्याच्या ट्रकचा आवाज साधारणपणे 80 ते 100 डेसिबल पातळी दरम्यान असतो. त्याखेरीज कचऱ्याच्या बकेट उचलताना आणि त्या रिकाम्या करताना होणारा आवाज आणि त्यांचा दुर्गंधी या सगळ्यांना या कामगारांना सामोरे जावे लागते.
6) नाईट क्लब मधील कर्मचारी 115 डेसिबल
जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही नाईट क्लब मध्ये जाल तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांना साधारणपणे 115 डेसिबल पर्यंत आवाजाच्या पातळीला सतत सामोरे जावे लागत असते.
7) फॉर्म्युला वन ड्रायव्हर 135 डेसिबल
फॉर्म्युला वन ड्रायव्हर जेव्हा त्याच्या मोटारीच्या कॉकपिटमध्ये बसतो तेव्हा त्याच्या पुढेच इंजिन असते. त्या इंजिनाच्या आवाजाची पातळी 135 डेसिबल पेक्षा जास्त असते.
8) एअरपोर्ट वरील ग्राउंड स्टाफ 140 डेसिबल
जे कर्मचारी विमानांच्या देखभालीचे आणि बॅगेज प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात, त्यांच्या अंगावर चमकणाऱ्या रंगाचे जाकीट असतात. त्याखेरीज त्यांच्या कानात इयरप्लग असतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जी आवाजाची पातळी 140 डेसिबल पेक्षा जास्त असते, त्यापासून त्यांच्या कानाचा बचाव होतो.
The post Jobs With Constant Noise : ‘या’ आहेत सतत आवाज आणि गोंगाट असलेल्या नोकऱ्या; कुठे 25 तर कुठे 140 डेसिबल असतो आवाज appeared first on Dainik Prabhat.
“}]]