Monday, June 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Jobs News : मिळालेला जॉबही हातातून जाऊ शकतो.! CV, Resume आणि Biodata मध्ये नेमका काय फरक? चुकीचा डॉक्यूमेंट दिल्यास नोकरी गमवाल

by
May 9, 2026
in लाईफस्टाईल
A A
Jobs News : मिळालेला जॉबही हातातून जाऊ शकतो.! CV, Resume आणि Biodata मध्ये नेमका काय फरक? चुकीचा डॉक्यूमेंट दिल्यास नोकरी गमवाल
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Jobs News : आजच्या स्पर्धेच्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी केवळ शिक्षण आणि कौशल्य पुरेसं नसतं, तर स्वतःची माहिती योग्य पद्धतीने सादर करणंही तितकंच महत्त्वाचं असतं.

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराला स्वतःची माहिती देण्यासाठी प्रामुख्याने CV, Resume आणि Biodata यापैकी एखादा डॉक्यूमेंट सादर करावा लागतो.

मात्र अनेक जण या तिन्ही गोष्टी एकच आहेत, असा गैरसमज करून घेतात. प्रत्यक्षात या तिन्हींचा उद्देश, स्वरूप आणि वापर पूर्ण वेगवेगळा असतो.

अनेक वेळा चुकीचा डॉक्यूमेंट पाठवल्यामुळे उमेदवाराची पहिली छाप खराब होऊ शकते. त्यामुळे नोकरी मिळण्याची संधीही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला CV, Resume आणि Biodata यांच्यातील फरक समजून सांगणार आहोत आणि कोणता डॉक्यूमेंट कधी वापरावा हे देखील सांगणार आहे.

Resume म्हणजे काय?

Resume हा सर्वात छोटा आणि नेमक्या माहितीवर आधारित डॉक्यूमेंट मानला जातो. सामान्यपणे तो १ ते २ पानांचा असतो. यात उमेदवाराची त्या विशिष्ट नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि महत्त्वाच्या उपलब्धी संक्षिप्त स्वरूपात दिलेल्या असतात.

Resume चा मुख्य उद्देश म्हणजे नोकरी देणाऱ्या कंपनीचे लक्ष वेधून घेणे. त्यामुळे तो प्रत्येक नोकरी आणि पदानुसार वेगळा तयार केला जातो.

उदाहरणार्थ, मार्केटिंगच्या नोकरीसाठी तयार केलेला Resume आणि आयटी क्षेत्रासाठी तयार केलेला Resume वेगळा असू शकतो. खासगी कंपन्यांमध्ये Resume चा वापर सर्वाधिक केला जातो.

CV म्हणजे काय?

CV चा पूर्ण अर्थ ‘Curriculum Vitae’ असा होतो. हा Resume पेक्षा अधिक सविस्तर डॉक्यूमेंट असतो. यात उमेदवाराची संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती दिलेली असते.

उदाहरणार्थ, शिक्षण, संशोधन, प्रोजेक्ट्स, रिसर्च पेपर्स, प्रकाशन, पुरस्कार, प्रेझेंटेशन, ट्रेनिंग, वॉलेंटिअर वर्क आणि इतर शैक्षणिक कामगिरी यांचा तपशील यात असतो. CV साधारणपणे २ ते १० पानांचा किंवा त्यापेक्षाही मोठा असू शकतो. यात वारंवार बदल केले जात नाहीत.

विशेषतः डॉक्टर, प्राध्यापक, संशोधक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी CV अधिक महत्त्वाचा मानला जातो. तसेच युरोपियन देशांमध्ये नोकरीसाठी CV वापरण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे.

Biodata म्हणजे काय?   (Jobs News) 

Biodata हा शब्द “Biographical Data” वरून तयार झाला आहे. यात उमेदवाराची वैयक्तिक माहिती अधिक प्रमाणात दिलेली असते.

उदाहरणार्थ, नाव, वय, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, धर्म, राष्ट्रीयत्व, भाषा, उंची, वजन, फोटो, वडिलांचे नाव इत्यादी माहिती Biodata मध्ये नमूद केली जाते.

भारत आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये Biodata अधिक प्रचलित आहे. विशेषतः सरकारी नोकऱ्या, बँकिंग, रेल्वे भरती तसेच विवाह जुळवणीसाठी Biodata चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

तिन्हीमध्ये नेमका फरक काय?

Resume हा थोडक्यात आणि नोकरीनुसार बदलणारा डॉक्यूमेंट असतो. CV हा सविस्तर शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती देणारा दस्तऐवज असतो. तर Biodata मध्ये वैयक्तिक माहितीला अधिक महत्त्व दिले जाते.

कोणता डॉक्यूमेंट कधी वापरावा?

खासगी कंपनी आणि कॉर्पोरेट नोकरीसाठी – Resume

संशोधन, शिक्षण, मेडिकल किंवा परदेशातील नोकरीसाठी – CV

सरकारी नोकरी किंवा वैयक्तिक माहिती (विवाह) आवश्यक असलेल्या ठिकाणी – Biodata

नोकरीसाठी अर्ज करताना योग्य माहिती योग्य स्वरूपात देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. CV, Resume आणि Biodata हे तिन्ही वेगवेगळे दस्तऐवज आहेत आणि त्यांचा वापरही वेगवेगळ्या उद्देशांसाठी केला जातो.

त्यामुळे कोणत्या नोकरीसाठी कोणता डॉक्यूमेंट आवश्यक आहे, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. योग्य दस्तऐवज सादर केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता वाढते आणि तुमची छापही अधिक प्रभावी बनते.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar