[[{“value”:”
Vodafone Idea | Recharge Price : रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता ‘व्होडाफोन इंडिया’ने आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. व्होडाफोन इंडियाने वाढवलेल्या या किमती 4 जुलैपासून लागू होणार आहेत.
Vodafone-Idea चा मूळ प्लॅन रु. 179 आहे, ज्याची किंमत रु. 199 झाली आहे. अशा प्रकारे कंपनीने आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ केली आहे.
प्रथम जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनबाबत अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जिओनंतर एअरटेलने टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्याबाबत बोलले. 5G सेवा सुरू केल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या योजनांमध्ये ही मोठी वाढ केली आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या नवीन किंमती 3 जुलैपासून लागू होणार आहेत. आता व्होडाफोन इंडियाच्या या घोषणेनंतर यूजर्सना धक्का बसला आहे.
रिचार्ज प्लॅनची किंमत पूर्वीपेक्षा किती वाढली आहे?
प्रथम : आता
179 रुपये : 199 रुपये
459 रुपये : 509 रुपये
269 रुपये : 299 रुपये
299 रुपये : 349 रुपये
319 रुपये : 379 रुपये
479 रुपये : 579 रुपये
539 रुपये : 649 रुपये
719 रुपये : 859 रुपये
839 रुपये : 979 रुपये
1799 रुपये : 1999 रुपये
वार्षिक योजनेत इतकी वाढ :
व्होडाफोन आयडियाच्या वार्षिक प्लॅनची किंमत 2899 रुपये असली तरी किंमत वाढल्यानंतर त्याची किंमत 3 हजार 499 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
याआधीही टेलिकॉम कंपन्यांनी काही योजना सुधारल्या होत्या पण यावेळी संपूर्ण पोर्टफोलिओ बदलण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनच्या वाढलेल्या किमती पुढील महिन्यापासून लागू होतील. मात्र, आता ही बातमी आल्यानंतर यूजर्स चिंतेत आहेत.
The post Jio, Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना करावा लागणार खिसा रिकामा, नवीन रिचार्ज प्लॅन जाणून घ्या…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]