Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Jaggery Infection: दररोज गूळ खाणं किती सुरक्षित? जास्त खाल्ल्यास वाढू शकतो अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनचा धोका

by
December 13, 2025
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Jaggery Infection: हिवाळा आला की गोड खाण्याची इच्छा वाढते आणि त्यात गूळ हा सर्वांचा आवडता नैसर्गिक गोड पदार्थ आहे. आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक गुळात असतात. पण त्याचा अतिरेक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो.

गुळात असतात अनेक गुण

गूळ हा नैसर्गिक स्वीटनर असून त्यात आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म आढळतात. थोड्या प्रमाणात गूळ खाल्ल्यास पचन सुधारते, इम्यूनिटी वाढते आणि शरीराला उष्णता मिळते. पण गुळाचा जास्त वापर शरीराला त्रासदायक ठरू शकतो.

जास्त गूळ खाल्ल्याने होणारे धोके

1. ब्लड शुगर वाढण्याचा धोका

सर्दीत गूळ फायदेशीर असला तरी 100 ग्रॅम गुळात 10–15 ग्रॅम फ्रक्टोज असतो. तो रोज भरपूर प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

2. अ‍ॅलर्जीची शक्यता

गुळाचा जास्त वापर केल्यास, पोटदुखी, सर्दी–खोकला, डोकेदुखी, मळमळ, उलटी अशा अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया दिसू शकतात. अशा वेळी गुळाची मात्रा कमी करावी.

3. अशुद्ध गुळामुळे पोटाचे इन्फेक्शन

कधी-कधी गूळ तयार करताना त्यात माती, धूळ किंवा इतर अशुद्धता राहतात. अशा गुळामुळे पोटात इंफेक्शन होऊ शकते. म्हणून विश्वासार्ह ब्रँडचा गूळ निवडणे योग्य.

4. गुळाची तासीर उष्ण… पचन बिघडू शकते

गूळ शरीरात उष्णता निर्माण करतो. जास्त खाल्ल्यास, पोटात जळजळ, बद्धकोष्ठता, पचन बिघडणे अशा समस्या होऊ शकतात.

5. वजन वाढू शकते

गुळात फ्रक्टोज, ग्लुकोज आणि थोड्या प्रमाणात फॅट असतं. 100 ग्रॅम गुळात सुमारे 383 कॅलरीज असतात. जास्त गूळ खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते.

गूळ आरोग्यासाठी चांगला, पण मर्यादित प्रमाणात खाल्ला तरच. थोडा गूळ फायद्याचा, पण अतिरेक मात्र हानिकारक.

Join our WhatsApp Channel

The post Jaggery Infection: दररोज गूळ खाणं किती सुरक्षित? जास्त खाल्ल्यास वाढू शकतो अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनचा धोका appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar