Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Jackfruit: फणस ठरतोय सुपरफूड! चवदारच नाही तर आरोग्यासाठीही जबरदस्त फायदेशीर

by
May 19, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Jackfruit: उन्हाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारा फणस हा फक्त चविष्ट पदार्थ नाही, तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सुपरफूड मानला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही आवडणाऱ्या या फळाला “व्हेजिटेरियन मीट” असेही म्हटले जाते. फणसापासून भाजी, बिर्याणी, कटलेट, लोणचे असे अनेक स्वादिष्ट पदार्थ टायर केले जातात.

आयुर्वेदानुसार फणसामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. विशेष म्हणजे व्हिटॅमिन बी समूहातील रिबोफ्लेविन आणि थायामिन यांसोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर आणि मॅंगनीजसारखी खनिजेही यात आढळतात. त्यामुळे शरीराच्या विविध कार्यांसाठी फणस अत्यंत उपयुक्त ठरतो.  (Jackfruit)

फणस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत करतो. यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला संसर्गांपासून संरक्षण देते आणि इम्युनिटी मजबूत करते. तसेच फणसात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट साफ न होण्याच्या समस्या कमी होतात.

तज्ज्ञांच्या मते, फणसामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. नियमित प्रमाणात फणस खाल्ल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील थकवा कमी करून ऊर्जा टिकवून ठेवण्याचे कामही हे फळ करते.  (Jackfruit)

वजन नियंत्रणासाठीही फणस उपयोगी मानला जातो. कारण यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही फणस चांगला पर्याय ठरू शकतो.

फक्त फणसाचे गरेच नाही, तर त्याच्या बियादेखील पौष्टिक असतात. या बिया उकडून किंवा भाजून खाल्ल्या जातात. त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्यामुळे शरीराला ताकद मिळते.

बिहार सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागानेही फणसाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, फणसाचे झाड पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्यास मदत करते आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते. तसेच फणसाची शेती शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन ठरू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, फणसाचे शास्त्रीय नाव ‘आर्टोकार्पस हेटेरोफिलस’ आहे. हे सदाहरित झाड असून त्याचे फळ मोठे आणि काटेरी स्वरूपाचे असते. चव, पोषण आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे फणसाला आता सुपरफूड म्हणून मोठी ओळख मिळत आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar