पुणे – सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण विविध शारीरिक तक्रारींना सामोरे जात असतो. त्यातही बैठ्या कामामुळे आणि आरामदायी जीवनशैलीमुळे लठ्ठप(obesity)णाची समस्या सार्वत्रिक आढळत आहे. वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी आपण काय करत नाही? नियमित आहार, व्यायाम, योग यासह अनेक घरगुती उपायांचा अवलंब आपण करतो.
आज रसपान असाच एक अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे आपले वजन निश्चित कमी होईल. खूप कमी लोकांना माहीत आहे की हिरव्या मुगामुळे वजन झटपट कमी होऊ शकते. मात्र, यासाठी एक डाएट प्लॅन फॉलो करावे लागेल कसे, ते जाणून घेऊ.
हिरवी मूग डाळ सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. यासाठी आपण आपला दिवस कोमट पाण्याने सुरू केला पाहिजे. हळूहळू कोमट पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन निघून जाण्यासह ते हायड्रेटेडही राहते. यानंतर हलका व्यायाम करा. मग हिरव्या मूग डाळीचे सूप बनवा. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. आले, मीठ, लसूण, हिंग, हिरवी मिरची, जिरे, धणे आणि बडीशेप घालुन याचे स्वादिष्ट सूप तयार करा. पण या सुपाला फोडणी मात्र अजिबात देऊ नका.
हिरव्या मुगाचे हे सूप दिवसातून 6 वेळा आणि सलग 3 दिवस पिल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात आणि यामुळे आपला लठ्ठप(obesity)णा कमी होण्यास खूप मदत होते. हे देखील लक्षात घ्यावे की हिरवे मूगडाळ सूप घेताना तेल, तूप आणि दही, टोमॅटो, लिंबू इत्यादी गोष्टी खाऊ नका. केवळ असे केल्याने शरीराला संपूर्ण लाभ मिळणार नाही. मूग डाळ प्रथिने भरपूर आहे. तसेच यात चरबी नसते.
हिरव्या मूगाच्या सुपाबरोबरच, आपण वेगवेगळ्या भाज्यांपासून बनविलेले कोशिंबीरदेखील खाऊ शकता. ते उकळवून किंवा वाफवण्याद्वारेदेखील वापरले जाऊ शकते. या कोशिंबीरात बीट, गाजर, शलगम नावाच कंद व त्याचा पाला, काकडी, कांदा, मुळा, दुधी भोपळा, कोबी, काकडीचा समावेश असू शकतो. मूग डाळीचे सूप घेतल्यानंतर पहिल्या दिवशी अशक्तपणा जाणवत असेल तर, दुसर्या दिवसापासून सूप पिण्याचे प्रमाण वाढवा. तसेच, क्वचित डोकेदुखी किंवा मळमळल्यासारखे होऊ शकते. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही कारण असे डिटोक्सच्या प्रक्रियेमुळे होते.
जर आपल्याला हिरवे मूग खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा रिफ्रेश व्हायचे असेल तर चहा आणि कॉफी पिऊ शकता. शिवाय 8 ते 10 ग्लास पाणी पिऊन आपण स्वत:ला ताजेतवाने करू शकता. हिरव्या मुगाचा हा डाएट फॉलो करताना सूपाला आणखी एक पर्याय म्हणजे हिरवे मूग भिजवून बारीक वाटून त्यात आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे टाकून डोसा अथवा चिला बनवून देखील खाऊ शकता. आपण दिवसातून तीन वेळा एक डोसा खाऊ शकता. हा आहार घेतल्यानंतर आपण वजन कमी करण्यात बराच पल्ला गाठू शकता.