[[{“value”:”
IPhone 17 Update : Apple iPhone 16 सीरीजची विक्री दि. 20 सप्टेंबरपासून भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. iPhone 16 खरेदी करण्यासाठी Apple च्या मुंबई आणि दिल्लीतील स्टोअरमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
iPhone 16 सीरीज अंतर्गत iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च करण्यात आले आहेत. iPhone 16 मालिकेतील सर्वात मोठा बदल कॅमेरा कंट्रोल बटणाच्या स्वरूपात आहे.
आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहेत. हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये येत आहेत. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, तर iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे. ॲपलने पहिल्यांदाच अल्ट्रामॅरिन कलरमध्ये आयफोन सादर केला आहे.
दरम्यान, अश्यातच आयफोन यूजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. iPhone 16 मालिकेतील चार फोन लॉन्च केल्यानंतर, लोकांमध्ये Apple iPhone 17 बद्दल चर्चा सुरू झाली. आता आयफोन वापरकर्ते आयफोन 17 मालिका आणि त्याच्याशी संबंधित लीकच्या माहितीची वाट पाहत आहेत.
अलीकडेच, iPhone 17 शी संबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की iPhone 17 सीरीजमध्ये काहीतरी देणार आहे जे Apple ने अद्याप कोणत्याही iPhone सीरीजमध्ये दिलेले नाही. जर तुम्हाला आयफोनचे वेड असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
iPhone 17 खूप वेगळा असणार :
Apple ने iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले प्रदान केला आहे, तर Android फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले बर्याच काळापासून उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत Apple ने योजना आखली आहे की iPhone 17 सीरीजच्या सर्व फोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले असेल.
iPhone 17 मालिकेत ‘हे’ बदल असतील :
आयफोन 17 मालिका आयफोन 16 मालिका किंवा कोणत्याही मागील आयफोन मालिकेपेक्षा खूपच सडपातळ असेल. अशा परिस्थितीत आयफोन 17 सीरीज कॅरी करणे खूप सोपे होईल आणि आयफोन 17 सीरीज जुन्या आयफोनपेक्षा खूपच हलकी असेल.
आयफोन 17 सीरिजमध्ये इतकी रॅम :
आयफोन 17 मालिका आधीच्या iPhones पेक्षा खूप वेगवान असेल. Apple iPhone 17 आणि iPhone 17 Plus मध्ये 8GB रॅम आणि iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मध्ये 12GB रॅम प्रदान करेल. आता हे पाहणे बाकी आहे की आयफोन 17 मालिकेशी संबंधित इतर कोणते लीक्स कधी पर्यंत बाहेर येणार.
The post IPhone 17 Update : आयफोन 16 नंतर आता ‘आयफोन 17’ची चर्चा; जबरदस्त फीचर्स आणि बरंच काही, कधी लॉन्च होणार, पाहा… appeared first on Dainik Prabhat.
“}]]