Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

International Women’s Day: महिलांच्या आरोग्यासाठी इशारा! पुरुषांपेक्षा महिलांना या पाच आजारांचा जास्त धोका

by
March 7, 2026
in लाईफस्टाईल
A A
International Women’s Day: महिलांच्या आरोग्यासाठी इशारा! पुरुषांपेक्षा महिलांना या पाच आजारांचा जास्त धोका
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

International Women’s Day: दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचे अधिकार, आरोग्य आणि समाजातील सहभाग याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. मात्र बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि ताणतणावामुळे महिलांमध्ये काही गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक संशोधनांनुसार काही आजारांचा धोका पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आढळतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खानपानामुळे अनेक महिलांना योग्य पोषण मिळत नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर महिलांना आहारातून आवश्यक पोषकतत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे अ‍ॅनिमिया, हार्मोनल समस्या, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या या आजारांचे प्रमाण वाढत आहे.

१. अ‍ॅनिमिया (रक्ताची कमतरता)

महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे अ‍ॅनिमिया. या स्थितीत शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनमुळे रक्ताद्वारे शरीराच्या विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा महिलांना थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि श्वास लागणे अशा समस्या जाणवू शकतात. लोहाची कमतरता हे या आजाराच मुख्य कारण आहे.

२. हार्मोनल समस्या आणि पीसीओएस

महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) हा त्यातील एक महत्त्वाचा विकार आहे. या आजारात शरीरात पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, चेहऱ्यावर केस येणे, मुरूम, वजन वाढणे आणि गर्भधारणेत अडचणी येणे अशा समस्या निर्माण होतात. जंक फूडचे जास्त सेवन, व्यायामाचा अभाव आणि वाढलेले वजन हे यामागील प्रमुख कारणे मानली जातात.

३. स्तनाचा कर्करोग

महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक म्हणजे स्तनाचा कर्करोग. स्तनातील पेशींची अनियमित वाढ झाल्यास हा कर्करोग होतो. स्तनात गाठ जाणवणे, स्तनाच्या आकारात बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव येणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. कुटुंबात कर्करोगाचा इतिहास, हार्मोनल बदल आणि मद्यपान यामुळे हा धोका वाढू शकतो.

४. हृदयविकाराचा धोका

पूर्वी हृदयविकार हा प्रामुख्याने पुरुषांचा आजार मानला जात होता. मात्र अलीकडील अभ्यासांनुसार महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. त्यामुळे वेळेवर तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

५. मानसिक आरोग्याच्या समस्या

ताणतणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबावामुळे महिलांमध्ये नैराश्य आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे अनेक अहवाल सांगतात. काही प्रकरणांमध्ये नैराश्यामुळे आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसते. त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

एकूणच, महिलांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास अनेक आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो.

 

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar