International Trip : यंदाच्या वर्षी विदेशात जाण्याचा प्लॅन करत आहेत परंतु बजेट आणि सेव्हिंगची चिंता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण विदेशातील काही पॉकेट फ्रेंडली ट्रीपबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. अशी अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणे आहेत जी तुम्ही ५० हजार रुपयांमध्ये कव्हर करू शकता. या बाबत आपण माहिती करून घेणार आहोत. तुम्ही पुढील ठिकाणी पन्नास हजारांच्या बजेटमध्ये फिरू शकता. ( International Trip under 50 thousand )
भूतान
भारताचे शेजारील राज्य भूतान हे ‘द लँड ऑफ थंडर ड्रॅगन’ म्हणूनही ओळखले जाते. हा एक अतिशय सुंदर आणि शांत देश आहे. ऍडव्हेंचरप्रेमी, निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी भूतान हे उत्तम ठिकाण आहे. भूतान एकट्याने प्रवासासाठीही खूप सुरक्षित आहे. ट्रोंगसा, फुंटशोलिंग, पुनाखा, ट्राशीगांग, हा व्हॅली, थिंपू ही इथली ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. 50 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा देश सहजपणे एक्सप्लोर करू शकता.
नेपाळ
भारताचे दुसरे शेजारी राज्य नेपाळलाही फ्रेंडली बजेटमध्ये भेट देणे शक्य आहे. हा देश नैसर्गिक सौंदर्य आणि चमत्कारांनी परिपूर्ण आहे. काठमांडू व्यतिरिक्त, येथे पोखरा पाहण्याची संधी गमावू नका, जिथे फोटो काढणायचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.इथले खाद्यपदार्थही भारतासारखेच आहेत, त्यामुळे परदेशात गेल्यावरही तुम्हाला भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थांची उणीव भासणार नाही.
श्रीलंका
श्रीलंका देखील परवडणारा आणि बजेट अनुकूल देश आहे. जे तुम्ही 50 हजारात सहज एक्सप्लोर करू शकता. श्रीलंका वन्यजीव प्रेमी आणि ऍडव्हेंचरप्रेमींना खूप आवडेल. सर्व प्रकारचे प्रवासी येथे येऊ शकतात.समुद्रकिनारे आणि पर्वतांचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही जरी एकटे प्रवासी असाल तरी इथे आल्यावर तुम्हाला कंटाळा येणार नाही.
मलेशिया
मलेशिया हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता. येथे, राष्ट्रीय उद्याने, उंच पर्वत, सुंदर समुद्रकिनारे म्हणजे भेट देण्याच्या ठिकाणांची कमतरता नाही आणि प्रत्येक गोष्टीचे दर खूपच कमी आहेत. मलेशियातील काही बेटे देखील करमुक्त आहेत. या वर्षी तुम्ही येथे जाण्याचा प्लॅन करू शकता.
थायलंड
थायलंड हा देखील स्वस्त देश आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे आणि बेटे तुम्हाला एका वेगळ्याच जगात असल्याचा भास होतो. इथे एकटे आलात तरी खूप मजा येईल यात शंका नाही. येथील नाईट लाईफ अतिशय प्रेक्षणीय आहे. जर तुम्हाला पार्टी आवडत असतील तर तुम्हाला थायलंडमधील जीवन खूप आवडेल. तसे, हे ठिकाण रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
The post International Trip : नवीन वर्षी विदेशात फिरायला जायचा प्लॅन करताय ? ‘या’ देशात फिरू शकता अगदी पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये appeared first on Dainik Prabhat.