Friday, April 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

महिलांमधील आर्थरायटिसचे वाढलेले प्रमाण

by प्रभात वृत्तसेवा
March 5, 2021
in आरोग्य वार्ता, फिटनेस, लाईफस्टाईल
A A
महिलांमधील आर्थरायटिसचे वाढलेले प्रमाण
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – महिलांना होणाऱ्या गुडघ्याच्या आर्थरायटिसचे प्रमाण वाढलेले असून, अलीकडे स्पष्ट झालेल्या ट्रेंडनुसार तरुण महिलांना गंभीर स्वरूपाचा आर्थरायटिस आणि वेदना होण्याचे प्रकार वाढले आहेत. मध्यम स्वरूपाचा वा गंभीर स्वरूपाचा आर्थरायटिस असलेल्या 15% महिलांचे वय 45 च्या खाली आहे आणि हे निश्‍चितच गंभीर आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार हृदयविकार, कर्करोग आणि एडस्‌ यासारख्या प्रचंड प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना पिछाडीवर टाकून ऑस्टिओ आर्थरायटिस हा पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार होणार आहे. पुढील काही वर्षात तरुणांना होणारा ऑस्टिओ आर्थरायटिस ही चिंता वाढवणार आहे.

ऑस्टिओ आर्थरायटिसची कारणे अजूनही पूर्णपणे समजलेली नाहीत. आनुवंशिक रचना, स्थूलपणा, जीवनशैली, आहाराच्या सवयी, इजा आणि बायोमेकॅनिक्‍सवर झालेला परिणाम यांची महत्त्वाची भूमिका असते. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रमाण अधिक असते, असे दिसून आले आहे. आहाराच्या बदललेल्या सवयी, प्रदूषण आणि अधिक बैठी जीवनशैली यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात ही तफावत आढळून येते. या घटकांचा पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक परिणाम होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले आहे आणि त्यांना आर्थरायटिस होण्याची शक्‍यता अधिक वाढते.

महिलांमध्ये स्थूलपणा वाढल्यामुळेसुद्धा ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रमाण वाढले आहे. आर्थरायटिस असलेल्या प्रौढांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण हे आर्थरायटिस नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 54% जास्त असते. इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीनमध्ये 2007 साली प्रकाशित झालेल्या डॉ. एम. के. शर्मा या भारतीय सांधेविकार तज्ज्ञांनी केलेल्या रोगपरिस्थितीविज्ञान अभ्यासानुसार आर्थरायटिस आणि स्थूलपणा यांच्यातील संबंध दाखवून देण्यात आला आहे. महिलांना आनुवांशिकतेने आर्थरायटिस होण्याची अधिक शक्‍यता असते. जनुकांमुळे शरीरातील उतींचा दर्जा ठरतो आणि त्यातूनच आर्थरायटिसची सुरुवात होते.

गुडघ्याच्या आर्थरायटिसमध्ये नक्की काय होते?
गुडघ्याच्या सांध्यांच्या पृष्ठभागाला (जिथे हाडे एकमेकांना स्पर्श करतात) कास्थींचे (मऊ उशी) आवरण असते. हा घटक शॉक ऍबसॉर्बरसारखे काम करतो आणि घर्षण कमी होते. कास्थी हे तुमच्या कारच्या टायरच्या रबरसारखे काम करते. फक्त हे सजीव असते आणि सूक्ष्म प्रमाणातील घर्षणाबाबतही ते अधिक चांगल्या प्रकारे काम करते.

आर्थरायटिस झालेल्या रुग्णांमध्ये ही कास्थी पातळ झालेली असते किंवा पूर्णपणे नष्ट झालेली असते. ही परिस्थिती एक्‍स-रेच्या माध्यमातून समोर येऊ शकते आणि हाडांच्या पृष्ठभागामधील पोकळी दिसून येऊ शकते. कास्थी नसल्यामुळे होणाऱ्या घर्षणाने डेब्रिस तयार होतो. परिणामी, सूज येते. त्यामुळे वेदना होतात, हालचालींवर परिणाम होतो आणि सांध्यांचे अजून नुकसान होते.

ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करू शकतो का?
वाढत्या वयानुसार गुडघ्यांचा थोडाफार ऱ्हास होणारच. केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे याप्रमाणेच गुडघ्यांमधील कास्थी पातळ होत जातात. सकस आहार आणि नियमित व्यायामाने आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतो आणि कास्थींचा ऱ्हास होणे काही प्रमाणात थांबवू शकतो. मधुमेहासारख्या वैद्यकीय समस्यांना दूर ठेवूनही ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करता येऊ शकतो.

आधुनिक वैद्यकशास्त्राने गुडघे प्रत्यारोपणाचा शोध लावत ऑस्टिओ आर्थरायटिसवर उपचार शोधले आहेत, पण ऑस्टिओ आर्थरायटिसचा प्रतिबंध करणे हा पुढील मोठा शोध असणार आहे. स्टेमसेलच्या क्षेत्रात चाललेल्या संशोधनामुळे येत्या काही दशकांमध्ये कास्थींचा ऱ्हास रोखण्यासाठी काही उपायांचा शोध लागू शकेल.

परंतु, ज्या महिलेला तरुण वयातच या आजाराच्या चौथ्या टप्प्याने गाठले आहे, त्या महिलेवर संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा काही सर्वात योग्य पर्याय असू शकत नाही? रुग्णाचे वय कितीही असले तरी संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा नेहमीच शेवटचा उपाय असतो. माझ्याकडे अनेक रुग्ण येतात, त्यांच्या गुडघ्याचा एक्‍स-रे दाखवतात आणि त्यांना गुडघे प्रत्यारोपणाची आवश्‍यकता आहे का, अशी विचारणा अनेकजण करतात.

केवळ एक्‍स-रे पाहून गुडघे प्रत्यारोपण करायचे की नाही ते ठरवता येत नाही. त्यांना वेदना किती प्रमाणात होत आहे, त्यांना नीट चालता येत नसल्यामुळे त्यांच्या राहणीमानावर किती परिणाम झाला आहे, या घटकांचाही विचार करण्यात येतो.

स्नायू बळकट करणारा व्यायाम (फिजिओथेरपी) आणि जॉइंट सप्लिमेंट्‌स या उपचारांचा प्रथम विचार करण्यात येतो. त्यानंतर व्हिस्कोसप्लिमेंटेशन इंजेक्‍शन देण्यात येतात. ज्या रुग्णांवर या उपचारांचा परिणाम होत नाही. त्यांच्यावर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जातो.

युनिकॉन्डिलर नी रिप्लेसमेंट
संपूर्ण गुडघे प्रत्यारोपणाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे तरुण महिलांनाही संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्या तरुण महिलांच्या गुडघ्यातील कास्थींचा एका बाजूला ऱ्हास झाला आहे, त्यांना अंशत: गुडघे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात येतो.

या प्रकाराला युनिकॉन्डिलर नी रिप्लेसमेंट असे म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी वेगाने होते आणि कोणत्याही बंधनाशिवाय तरुण महिला आपली दैनंदिन कामे करू शकतात. वयोगट कोणताही असू दे, जर गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया योग्य रुग्णांवर केली तर त्यांना बराच काळ वेदनारहित आयुष्य जगता येईल.

– डॉ. अरुण गद्रे

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2019aarogya jagaraarogya jagar 2020aarogya jagar newsaarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife styleaarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar