Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

IMP NEWS | जाणून घ्या… “म्युकरमायकोसिस’वर उपचार करायचे कसे? – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 7, 2021
in आरोग्य वार्ता
A A
IMP NEWS | जाणून घ्या… “म्युकरमायकोसिस’वर उपचार करायचे कसे? – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – “म्युकरमायकोसिस’ रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या गाइडलाइन्स अर्थात मार्गदर्शक सूचना या सर्वसमावेशक नाहीत. त्या अंमलात आणण्यालायक नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नव्या गाइडलाइन्स येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

“घाईगडबडीत एखाद्या रुग्णालयाने त्यांच्यापुरत्या तयार केलेल्या सूचना गाइडलाइन्स म्हणून आणल्या गेल्या आहेत. त्या अतिशय जुजबी आणि पुस्तकी असून, त्या समजण्यासारख्या नाहीत.

त्यातून उपचारांची दिशाच स्पष्ट होत नसल्याने रुग्णांचे डोळे, जबडा आणि अन्य अवयव गरज नसतानाही काढले जात आहेत, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्याच्या गाइडलाइन्स या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाने त्यांच्या स्वत:साठी बनवलेल्या होत्या. त्याच राज्यसरकारने “कॉपी-पेस्ट’ केल्या आहेत.’

“त्यामुळे नव्या सुधारित, अभ्यासपूर्ण, सर्वसमावेशक गाइडलाइन्सची गरज आहे. रुग्णांचे निदान, उपचार आणि सुश्रूषा यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश राज्य वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले आहेत.

यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या “कान, नाक, घसा’ विभाग, नेत्र विभागांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे रुग्णांवरील उपचाराची दिशा स्पष्ट होण्याला मदत होणार आहे. संसर्गाच्या सुरुवातीलाच अवयव काढण्याचे प्रकार यामुळे आटोक्‍यात येतील,’ असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

गेल्या दोन महिन्यांत म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु, या आधीच्या करोना लाटेनंतरही अनेक म्युकरमायकोसिस झालेले रुग्ण ससूनमध्ये आले आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

त्यामुळे ससूनसारख्या रुग्णालयांत असे रुग्ण हाताळण्याचा अनुभव आणि यंत्रणा आहे. मात्र, ज्या खासगी किंवा छोट्या शासकीय रुग्णालयांत या रोगाची लागण झालेले रुग्ण येतात तेव्हा डॉक्‍टरांचा अनुभव कमी पडतो. त्यावेळी या गाइडलाइन्स महत्त्वाच्या ठरतात,’ असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डॉक्‍टर म्हणतात…
औषधोपचार, इंजेक्‍शन्स आणि शस्त्रक्रिया यांच्या समन्वयाने उपचार करून या आजारावर मात करता येऊ शकेल. या नव्या गाइडलाइन्सनुसार अवयव वाचण्याचीही शक्‍यता मोठ्याप्रमाणात आहे.

सुरुवातीच्याच टप्प्यात थेट शस्त्रक्रियेऐवजी अन्य औषधोपचाराने त्याचा संसर्ग वाढण्यापासून थांबवणे आणि त्यानंतर शस्त्रक्रियेसारखे उपचार करता येऊ शकतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar