Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Immunity Boosting Foods: लहान मुलांची इम्युनिटी कशी वाढवावी? पेडियाट्रिशियनचा सल्ला… जाणून घ्या काय खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती जास्त वाढते?

by
December 9, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Immunity Boosting Foods: हिवाळ्यात बाळांची तब्येत पटकन बिघडण्याची शक्यता जास्त असते. कारण लहान मुलांची इम्युनिटी पूर्ण विकसित नसते. त्यामुळे त्यांच्या आहारात काही खास पदार्थ रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट केले, तर त्यांचे शरीर आजारांपासून वाचू शकते. पेडियाट्रिशियनच्या मते बाळांची इम्युनिटी वाढवण्यासाठी काही उत्तम खाद्यपदार्थ आहेत.

लहान मुलांच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करावेत हे सुपरफूड्स

१) बाजरी आणि रागी

डॉक्टरांच्या मते, बाजरी आणि रागी हे हिवाळ्यातील सुपरफूड्स आहेत. यात आयर्न, कॅल्शियम आणि झिंक मुबलक असते. हे पदार्थ खाल्ल्यावर बाळाला ऊर्जा मिळते आणि त्यांची रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

२) सुके मेवे आणि बीया

बाळांना सुके मेवे खूप फायदेशीर असतात. बदाम, अक्रोड, चिया सीड्स, जवस या बियांमध्ये हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते. यामुळे बाळाचा मेंदू मजबूत होतो आणि इम्युनिटीही वाढते. रोज एक छोटा चमचा मिक्स ड्रायफ्रूट्स किंवा बिया देता येतात.

३) मौसमी फळे आणि भाज्या

डॉक्टर सांगतात की इम्युनिटी वाढवण्यासाठी मौसमी फळे आणि भाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. संत्रे, आवळा आणि पपई हे फळे व्हिटॅमिन C ने भरलेले असल्याने सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन A आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे बाळाला हिवाळ्यातील सर्दी-खोखल्यापासून आराम भेटतो.

४) हळदीचे दूध

रात्री झोपण्यापूर्वी बाळाला एक छोटा चमचा हळदीचे दूध देऊ शकता. हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि बाळाची इम्युनिटी मजबूत होते.

५) रताळे

हिवाळ्यात रताळे हे अतिशय पौष्टिक आणि इम्युनिटी वाढवणारे असते. यात बीटा कॅरोटीन आणि फायबर भरपूर असतात, ज्यामुळे बाळाचे पोटही मजबूत राहते आणि शरीर रोगांशी लढू शकते.

एकूणच, बाळाच्या दैनंदिन आहारात हे नैसर्गिक पदार्थ दिल्यास त्यांची इम्युनिटी नैसर्गिकरित्या वाढते आणि ते हिवाळ्यातील आजारांपासून बरेच प्रमाणात सुरक्षित राहतात.

Join our WhatsApp Channel

The post Immunity Boosting Foods: लहान मुलांची इम्युनिटी कशी वाढवावी? पेडियाट्रिशियनचा सल्ला… जाणून घ्या काय खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती जास्त वाढते? appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar