Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Iftar Meal Plan: रोजा सोडताना काय खावं? जाणून घ्या इफ्तारसाठी योग्य आहारक्रम!

by
February 26, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Iftar Meal Plan: रमजानच्या महिन्यात अनेकजण दिवसभर रोजा पाळतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता-पिता राहिल्यानंतर इफ्तारच्या वेळी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा दिवसभर उपाशी राहिल्यानंतर लोक जास्त तळलेले, तेलकट आणि गोड पदार्थ खातात. मात्र अशी सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, इफ्तारचा उद्देश फक्त पोट भरून समाधान मिळवणे नसून शरीरातील पाणी, मीठ आणि प्रोटीनची कमतरता भरून काढणे हा असावा. चुकीच्या पद्धतीने इफ्तार केल्यास अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी, बेचैनी आणि दुसऱ्या दिवशी आळस जाणवू शकतो.

इफ्तारची सुरुवात कशी करावी? Iftar Meal Plan

रोजा सोडल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाणी घ्यावे. त्यात थोडं मीठ किंवा लिंबू घालता येईल. खूप थंड पाणी लगेच पिल्यास अ‍ॅसिडिटी वाढू शकते. त्यामुळे पाणी हलकं कोमट असणं चांगलं. दिवसभर उपवास केल्यानंतर शरीराला सर्वात आधी हायड्रेशनची गरज असते.

१० ते १५ मिनिटांचा ब्रेक घ्या

पाणी घेतल्यानंतर लगेच जड पदार्थ खाणं टाळावं. १० ते १५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यावा. यामुळे पोटाला आणि शरीराला अचानक ताण येत नाही. लगेच तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ल्यास जास्त कॅलरीज शरीरात जातात आणि अपचन होऊ शकतं.

मुख्य जेवण कसं असावं?

ब्रेकनंतर मुख्य जेवणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा समतोल असावा. उदाहरणार्थ, ग्रिल्ड चिकन, अंडी किंवा कडधान्ये यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावेत. सोबत भात किंवा पोळी चालेल. तळलेले समोसे, पकोडे यांसारखे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी शिजवलेल्या भाज्या आणि सॅलडचा समावेश करावा.

जर इफ्तारनंतर व्यायाम करण्याची सवय असेल, तर हलका प्रोटीन शेक किंवा ओट्सचा पर्याय निवडता येईल.

गोड पदार्थ कसे खावेत?

इफ्तारमध्ये खीर, सेवई किंवा इतर गोड पदार्थ खाण्याची परंपरा आहे. मात्र गोड पदार्थ पोट भरण्यासाठी नव्हे, तर चव म्हणून मर्यादित प्रमाणात खावेत. गोड पदार्थ शेवटी घ्यावेत. गोड पेय किंवा पॅकेज्ड फळरस टाळावेत, कारण त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.

हायड्रेशनवर लक्ष द्या

इफ्तार आणि सहरीच्या दरम्यान साधारण २.५ ते ३.५ लिटर द्रवपदार्थ घ्यावेत. मात्र एकदम खूप पाणी पिऊ नये. थोड्या थोड्या प्रमाणात पाणी प्यावं. जास्त घाम येत असल्यास इलेक्ट्रोलाइट्सचा उपयोग करता येईल.

योग्य क्रम पाळणं महत्त्वाचं आहे. आधी खजूर आणि पाणी, मग हलकं प्रोटीन व कार्बोहायड्रेट, आणि शेवटी थोडं गोड. असा संतुलित आहार घेतल्यास संपूर्ण रमजान महिन्यात शरीर ताजंतवानं आणि ऊर्जावान राहू शकतं.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar