Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पावसाळा एंजॉय करायचाय तर मग ‘या’ पदार्थांपासून लांब रहा

by प्रभात वृत्तसेवा
December 4, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पावसाळा सुरू झाला की हिरव्या डोंगर दऱ्यांमधून भटकंती करण्यापासून आपण स्वत:ला थांबवू शकत नाही. एवढेच नाही तर पावसाचे थेंब अंगावर घेत भटकत काही तरी चटक मटक खाण्याचा मोहदेखील कोणाला आवरत नाही. परंतू, हा मोह पावसाळ्यात जेवढा हवाहवासा तेवढा मोह न केलेला बरा कारण पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेवून येत असतो. म्हणूनच जर आपल्याला चटर-पटर खाण्याची सवय असली तरी पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहणच बरं. या दिवसांमध्ये पोट नाजुक होऊन जातं ज्याने जेवण नीट पचत नाही आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार पसरण्याची जास्त भीती असते. दरम्यान, काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरिराला नुकसान पोहचू शकतात.

पाऊस आणि गरमा-गरम भजी हे समिकरण जणू अनादी काळापासून सुरू आहे असेच वाटते. कारण पाऊस पडला की गरम भजी आणि चहा आठवतो. मात्र, या दिवसांत तेलात तळलेली ही गरम भजी पचवण्यासाठी कठीण असतात. ज्याने आपले पोट खराब होऊ शकतं म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणं शक्‍यतो टाळलेलंच बरं…

प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्याला, प्रत्येक रस्त्याच्या कडेला लागणारे चाटचे ठेले प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात…प्रत्येकाला चाट खाणं आवडतच पण हे बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाटे आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम करू शकतात. खास करून पावसाळ्यात या अशा ठेल्यांकडे दुर्लक्ष केले तर आपण पावसाळा चांगल्याप्रकारे एंजॉय करू शकतो.

पाणी पुरीचे नाव जरी काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतू, या दिवसांमध्ये पाणी पुरी मुळीच खाऊ नये. यात वापरण्यात येणाऱ्या पाण्यात भरपूर जिवाणू असतात. ज्याने आपल्याला उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे, आणि टायफॉइड सारखे आजार होऊ शकतात.

रस्त्याचा बाजूला लागणारे चायनीज फूडचे ठेले आपल्याला स्वस्त डिश सर्व्ह करतात मात्र, ते नूडल्स किंवा राईस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी स्वच्छ असतंच असं नाही. यात घातले जाणारे तेल, अजीनोमोटो आणि सॉसेस आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चायनिझ प्रेमींना पावसाळा थोडा जिभेवर आवर घालावा लागेल.

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कोशिंबीरमध्ये घालू नये. यात सूक्ष्म कीट असतात. हे खाण्याने पोटाचा संसर्ग होऊ शकतो.

ज्यूस पिणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी पावसाळ्यात फळ लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळा आणि आधीपासून कापून ठेवलेले फळं ही खाऊ नका. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे तुम्हाला जर हा पावसाळा छान एंजॉय करायचा असेल तर प्रथम आरोग्याला त्रास देणाऱ्या पदार्थांना तुमच्यापासून दुर ठेवा.

Tags: healthlifestyle
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar