पुणे – आपल्याकडे हल्ली अतिबारीक म्हणजे सुंदर, साईझ झिरो वगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. सध्या परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा बनली आहे. चित्रपटातील अभिनेत्रींना पाहून प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडतो की, एका लेकाची आई झाली तरी ही इतकी सुंदर कशी दिसते. ‘खाती क्या है?’ दरम्यान, आज आम्ही या सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला सांगणार आहोत…
View this post on Instagram
कच्ची फळे आणि भाज्या सलाद स्वरूपात खाऊ शकता. याने तुमच्या शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळेल. फायबरमुळे तुमची पचनक्रिया योग्यप्रकारे काम करेल. तसेच याने जाडेपणा आणि हृदयासंबंधी समस्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासही मदत मिळते.
View this post on Instagram
नियमितपणे व्यायाम करण्याला पर्याय नाही. रोज साधारण २० ते ४० मिनिटे ब्रिक्स वॉकिंग (वेगाने चालणे) करा. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी एरोबिक सुद्धा करू शकता.
View this post on Instagram
दैनंदिन आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि कडधान्याचा समावेश करा. कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट फूडचं सेवन जास्त करा, जसे की, गहू, ज्वारी आणि बाजरी यांचा आहारात समावेश करा.
View this post on Instagram
मैदा आणि त्यापासून तयार पदार्थ जसे की, ब्रेड नूडल्स, मॅकरॉनी आणि पास्ता खाणे टाळा. दिवसभर थोडं थोडं खावं. एकाचवेळी जास्त पोट भरू नका. गोड पदार्थ किंवा साखर कमी खावी. यातील फ्रक्टोजमुळे आरोग्याचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं.
View this post on Instagram