दर पाऊण ते एक तासाने कामातून जरा विश्रांती घेऊन काही सोपे व्यायाम करावेत.
काही सोप्या व्यायामपद्धती – ( neck pain exercise in marathi )
1. हनुवटी आत घेऊन, मान मागे घेत ताठ करणे. त्याचबरोबर फरे मागील बाजुस एकत्र करणे. असे धरून ठेवणे.
2. मान हळुवार खाली आणि नंतर वर अशी हालचाल करणे. दोन्ही स्थितींमध्ये मान ताठ ठेवणे. तसेच मानेवर ताण देणे.
3. हळुवार डोकं मागे पुढे करणे, व 5 सेकंदांसाठी धरून ठेवणे
4. मानेची हळुवार हालचाल करत असताना आता ती मागे-पूढे आणि इतर दोन्ही बाजुंना अशी फिरवत हळू हळू गोलाकार पद्धतीने फिरवावी. हे करत असताना मानेवर ताण असू नये. परंतु ती अगदीच सैल ही सोडू नये. ( neck pain exercise in marathi )
अशा पद्धतीचे काही सोपे व्यायाम दररोज केल्यास मानदुखीचा त्रास कमी होईल आणि नंतर तो होणारच नाही. कम्प्युटर ऑपरेटिंगच्या कामाबरोबरच अति प्रमाणात गाडी चालवणे तसेच सतत पुढे वाकून एखादे काम करणे यांमध्येदेखील अशा चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे पाठीचे आणि पर्यायाने मानेचे स्नायु दुखावले जातात आणि मग ते दुर्बल होऊ लागतात. त्यामुळे मानदुखी वाढायला सुरूवात होते. अशांनी देखील थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने वरील सोपे व्यायाम करावेत. यामुळे मानेला आराम मिळू शकतो.