पुणे – चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं ही समस्या कोणत्याही महिलेसाठी एखादया वाईट स्वप्नाप्रमाणे असू शकते. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते. काहीनंतर अगदी तारूण्याच्या उंबरठ्यावर असतांना चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कशा कमी कराव्या ही चिंता सतावू लागते. मात्र, आता तुम्ही कोणतीही चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही फायदेशीर उपचार सांगणार आहोत. त्यामुळे तुमची त्वचा पूर्वीसारखी सुंदर, तजेलदार, टवटवीत होईल…
१) अर्धा चमचा दुधावरची साय घेऊन त्यात १०-१२ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चांगल एकत्र करून घ्या व रोज रात्री झोपतांना चेहऱ्यावर लेप करा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर लेप करण्यापुर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
२) पिकलेली केळी व पिकलेली पपई एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये थोडं मध टाका. एकत्र करून चेहऱ्यावर लेप करावा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा व कॉटनच्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसावा. हा लेप आठवड्यातुन ३ वेळा करावा.
३) चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता.
४) हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची मुळीच गरज नाही.यासाठी फक्त पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.सकाळी या बदामांची साले काढून दुधासह बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.चेहऱ्यावर हे मिश्रण लावून वीस मिनीट चेहरा तसाच ठेऊन नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.