मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा तो असलेल्या लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो. मधुमेही लोकांना झोप लवकर लागत नाही. रात्री उशिरापर्यंत ते जागत बसतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि मग त्यांची प्रचंड चीडचीड होते. या सगळ्याची परिणती रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढण्यात होते. रात्री उशिरा झोपण्याची सवयही टाईप 2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते.
आतापर्यंत मधुमेह होण्यास फक्त लठ्ठपणा कारणीभूत आहे असं मानलं जायचं, पण मधुमेह होण्यापाठी कितीतरी कारणं असतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते. तुम्ही जितके कमी तास झोपाल, खाण्याची इच्छा तितकीच जास्त होईल. तुम्ही थकलेले असता तेव्हा तुमचे शरीर भुकेची भावना करून देणारे हार्मोन स्रवते, त्यामुळे अधिक खावंसं वाटतं. परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कबरेदकांचं सेवन केलं जातं. दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना दररोज 7 ते 8 तास झोप घेणाऱ्या व्यक्तींपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या लोकांमध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, त्यांनाही मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.
मधुमेही लोकांना झोपेचा त्रास असतो. मधुमेही लोकांपैकी किमान अर्ध्याहून अधिक लोकांना रात्री झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्रवत नाही. त्यामुळे तुम्हाला टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि तात्पर्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
पुरेशी झोप न मिळण्याने ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे त्यांना हा धोका आणखीनच वाढतो. सलग काही रात्री झोप मिळाली नाही तर या व्यक्तींच्या जीवावरही बेतू शकतं. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेही लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो असे पुराव्याने सिद्ध झालेले आहे. एक-दोन दिवस पुरेशी झोप झाली नाही, तर ती झोप नंतर भरून काढता येते; पण झोप न लागण्याचा त्रास कायम राहिला तर मात्र त्यातून सावरणे अवघड होऊन बसते. जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, झोप भरून काढणं तितकंच अशक्य होत जाईल. असं झाल्यास तुमचं शरीर पुरेशी झोप न मिळण्यालाच सरावून जाईल आणि त्याची परिणती तुमचा मधुमेह वाढण्यात होईल.( sleep sugar patient )
बहुतेक लोकांना रात्री सात ते नऊ तासांच्या झोपेची गरज असते, तरीही भारतीय लोक सहा तासांहून कमी झोप घेतात असे अभ्यासातून दिसून आले आहे. या समस्येवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घ्या. ठरावीक वेळी झोपा आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावा. त्यामुळे तुमचे शरीरही या वेळापत्रकाला सरावेल आणि तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री उशिरापर्यंत जागू नका, पुरेशी झोप घ्या, आरोग्यदायी आहार घ्या आणि व्यायाम करणे सोडू नका!
पुरेशा झोपेसाठी
ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. वैज्ञानिकांच्या मतानुसार झोपेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन होतात. त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो. पुरेशी झोप मिळाली नाही तर दुस-या दिवशी थकवा जाणवतो. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे झोप वयानुसार कमी-जास्त होत असते. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.( sleep sugar patient )
सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्तीला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते.
झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित करावी.
झोपण्याचं ठिकाण शांत असावं. तसंच काही जणांना खोलीत लाईट लावायची आवड असते त्या दिव्याचा प्रकाश हलका असावा.
डोक्याखाली घेतली जाणारी उशी व्यवस्थित असावी. त्याचा जोर आपल्या डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
रात्रीच्या जेवणात चांगला सकस आहार घेतलात तर झोप चांगली येईल. त्यात तांदूळ, बटाटा आणि मुळं असलेल्या भाज्यांचा समावेश करावा.
झोपण्यापूर्वी अतिरिक्त म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये.
दिवसा नियमित व्यायाम करावा, म्हणजे रात्री चांगली झोप येईल.
झोपण्यापूर्वी मनातील चिंता, काळजी दूर करा.
मधुमेह आणि दंत आरोग्य( sleep sugar patient )
रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केल्यास तुम्हाला हिरडयांचे आजार होण्याची खूप शक्यता असते. दातांची झीज, तोंड कोरडे होणे, तोंडात बुरशीजन्य पदार्थ जमा होणे यासारखे विकार होण्याची शक्यता असते. 14 नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने मधुमेहाचा आणि मुखाच्या आरोग्याचा संबंध जाणून घेऊ या.
मधुमेह हा एका विषासारखा आजार असून तो विविध अवयवांवर परिणाम करतो आणि आरोग्याचे इतर प्रश्नही त्यामुळे भेडसावतात. नंतरच्या टप्प्यांमध्ये हे आजार डोळे, मज्जाव्यवस्था, मूत्रपिंड आणि हृदय इत्यादींवर परिणाम करतात.
मधुमेह संसर्गाप्रती आपली प्रतिकारशक्ती कमी करतो आणि बरं होण्याच्या प्रक्रियेचा वेगही कमी करतो. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्हाला हिरड्यांचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला रक्तशर्करेचं व्यवस्थापन करताना दात आणि हिरड्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
रक्तशर्करेच्या पातळ्यांचे नियंत्रण नीट न केले गेल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार होण्याची खूप शक्यता असते आणि मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत आपण जास्त दात गमावू शकता. मधुमेहाशी संबंधित सर्वाधिक सर्वसामान्य मुख आरोग्य त्रास खालीलप्रमाणे आहेत
दातांची झीज( sleep sugar patient )
आहारातील आणि शीतपेयांमधील स्टार्च व साखर या जीवाणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा प्लाक नावाचा चिकट पडदा तुमच्या दातांवर तयार होतो. प्लाकमधील आम्लं तुमच्या दाताच्या पृष्ठभागावर हल्ला करतात (इनॅमल आणि डेंटिन). यामुळे कीड लागण्याची शक्यता असते.
कोरडे तोंड
कोरडे तोंड हे तुमच्या तोंडातील ग्रंथींमधून (लाळग्रंथी) निर्माण होणाऱ्या लाळेच्या प्रमाणातील घट झाल्यामुळे होते आणि तो सामान्यत: औषधांचा साईड इफेक्ट असतो.
बुरशीजन्य संसर्ग :
तोंडाची जळजळ मधुमेह असलेल्या लोकांना संसर्गाचा सामना करण्यासाठी सतत अँटिबायोटिक्स घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना तोंडात आणि जिभेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. ही बुरशी अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांच्या लाळेतील साखरेच्या उच्च प्रमाणावर जगतात. त्यामुळे तुमचे तोंड आणि जीभ जळजळू शकते. कीड तुम्हाला दंतक्षयामुळे कीड निर्माण होते. ती दाताच्या बाहेरील आवरण इनॅमल) आणि अंतर्गत आवरण (डेंटिन) त्यावरही परिणाम करू शकते.
हिरड्यांची सूज( sleep sugar patient )
ही जीभ, हिरड्या, ओठ किंवा गालांच्या आत होते. ते अल्सर्स म्हणून किंवा तोंडात लाल-पांढरे चट्टे म्हणून दिसू शकतात.
अल्सर्स
या सामान्यत: लहान, वेदनादायी फोडी असतात, ज्या तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरड्यांच्या तळाशी होऊ शकतात. त्यामुळे खाणे, पिणे आणि बोलणे वेदनादायी होऊ शकते.
चवीतील अडथळे
हा सर्वात मोठा चवीतील अडथळा आहे, जो टिकून राहतो. सामान्यत: तुमच्या तोंडात काहीही नसले तरीही नकोसे वाटते.
तुम्ही हे त्रास दूर करण्यासाठी बरंच काही करू शकता. त्यासाठी आपल्याला तोंड, दात आणि हिरड्यांची नीट काळजी घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत( sleep sugar patient )
तुमचे तोंड कोरडे असल्यास ते अल्कोहोलमुक्त माऊथवॉशने खळबळून धुवा.
तुमच्या आहारात दूध, चीझ, चिकन इत्यादींचा समावेश करा. या आहारामुळे दाताच्या इनॅमलला कॅल्शियमचा पुरवठा करून त्याचे संरक्षण होते.
प्रत्येक आहारानंतर तुमचे दात स्वच्छ घासा. खाण्यानंतर ब्रशपूर्वी किमान अर्धा तास थांबून इनॅमलचे संरक्षण करा.
मऊ ब्रिसल्सचे टूथब्रश वापरा.
दिवसातून एकदा तरी फ्लॉस करा.
डेंचर्सचा वापर करत असल्यास ते रोज स्वच्छ करा. डेंचर्स लावून झोपू नका.
धूम्रपानाच्या सवयीवर नियंत्रण ठेवा.
दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीसाठी दंतवैद्यकाला भेट द्या.
शक्य तितक्या नॉर्मल प्रमाणात रक्तशर्करेचे प्रमाण ठेवा.
प्रजनन यंत्रणेवर परिणाम( sleep sugar patient )
माता मधुमेही असेल तर मुलाला मधुमेह होतो असा बहुतेकांचा समज असतो. पण अलीकडेच झालेल्या संशोधनाने हा विचार बदलायला लागला आहे. वडिलांना उच्चपातळीवरील मधुमेह असेल तर त्याचा शुक्राणूंच्या दर्जावर परिणाम होतो आणि त्यामुळे नवजात बालकामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य आहार आणि व्यायाम करून मधुमेहावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जननेंद्रियांना झालेल्या संसर्गावर उपचार करावेत आणि आवश्यकता असेल तर समुपदेशन घ्यावे. अशा परिस्थितीत समाजाची मदत हाही एक महत्त्वाचा घटक असतो. मधुमेहामुळे लिंग ताठरतेमध्ये बाधा निर्माण होते. त्यामुळे लघु रक्तपेशींच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि टेस्टेस्टेरॉनची पातळी कमी होते. परिणामी, शरीरसुखाच्या प्रेरणेवर विपरीत परिणाम होतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करून स्खलनावर नियंत्रण ठेवणाऱ्या सूक्ष्म नसांवर परिणाम होऊन स्खलनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊन प्रजनन यंत्रणेवर परिणाम होतो.