हे देशभर माळ जमिनीत होते. याच्या काटक्या नित्य जळणासाठी देशावर उपयोगात आणतात. ( tanner cassia )
शक्ती येण्यासाठी – याच्या सालीचे वस्त्रगाळ चूर्ण 1 ग्रॅम, तूपसाखरेतून घ्यावे, चांगली शक्ती येते.
ओकारीवर उपयुक्त – तरवडीच्या फुलांचा रस ओकारीवर देतात. त्यामुळे ओकारी थांबते.
डोळ्याच्या खुपऱ्याच्या आजारावर – तरवडाच्या बियांचा कधीही बऱ्या न होणाऱ्या खुपऱ्यांवर उपयोग होतो. डोळ्यांस लाली असून डोळ्यांची बुबुळे मोठी झाली असता, डोळ्यास अत्यंत खाज, त्यातून सारखे पाणी गळते अशा डोळ्यास तरवडाच्या बियांचे बारीक वस्त्रगाळ केलेले चूर्ण घातल्याने फार फायदा होतो. खुपऱ्या मोडतात. ( tanner cassia )
दात बळकट होण्यासाठी – तरवडाचे दातवण फार चांगले होते व ते दातवणासाठी फार उपयोगात आणतात. तरवडाची राख जाळून नित्य दातास चोळल्याने दात बळकट होतात व स्वच्छ राहतात.
पोट साफ न होणे,घसा बसणे,शीघ्रपतन,चेहऱ्यावरील डाग,लघवीतील जळजळ अशा एक ना अनेक आजार मात करतो तरवाडाचा चहा. अशाप्रकारे तरवड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. ( tanner cassia )