हल्ली सगळ्यांना झटपट हवं असतं सगळंच.
जसं झटपट वजन वाढतं तसंच ते झटपट कमी करायची आत्यंतिक घाई असते.
ते का वाढलंय कशामुळे वाढलंय
याचा विचार केलाच जात नाही.
मग लोक त्यासाठी काही पण करायला तयार असतात. अगदी भरपूर पैसे खर्च
करून कोणतेही प्रॉडक्टसुद्धा खायला
तयार असतात; परंतु हे सगळ करताना
हा विचार केला जात नाही की
आपण आपल्या शरीराची
हेळसांड करतोय.डॉ. श्रुती देशपांडे
आपलं शरीर एक प्रकारच यंत्रच आहे की ज्यात सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. सगळी संप्रेरके आपली कामे नीट करत असता; परंतु आपण शरीरात अनैसर्गिक काहीतरी ढकलतो आणि त्याचा परिणाम शरीरातल्या अंतर्गत यंत्रणेवर होतो, पण आपण वरकरणी विचारात गुंग असतो. अक्षरशः हे करून पाहू ते करून पाहू म्हणून नेटवर सर्च करून क्राश डाएट करायचा किवा कोणते तरी शेक घ्यायचे. यांनी काही महिने वजन कमी झाल्यासारखे वाटते. पण काही महिन्यांनी हा डाएट सोडला जातो. मग दुपटीने वजन वाढ होते.
क्राश डाएट करताना होतं काय ते समजून घेऊ. शरीराला रोजच्या रोज सगळी कॅलरी जीवनसत्व, प्रथिने, खनिजे योग्य त्या प्रमाणात हवी असतात. ज्यावर बाकीच्या शारीरिक यंत्रणा चालू असतात. न खाण्याचे प्रकार करताना शरीराला काहीच मिळत नाही. मग शरीर जगण्यासाठी जो जीवनसत्वाचा कॅल्शीयमचा साठा आहे तो वापरायला सुरुवात करते. म्हणजे हाडांमधून काल्शियम घेतेले जाते.
रक्तामध्ये या सगळ्याची पातळी नीट राखली तर आपण नीट शुद्धीत व जिवंत राहू शकतो. म्हणून रक्तातील सुयोग्य पातळीसाठी शरीर प्रथिने काल्शियम इतर जीवनसत्व हे इतर अवयवांना मागून नीट राखायचा प्रयत्न करते, पण हा साठा कधीतरी संपतोच आणि मग शरीर दुखणी दाखवायला सुरुवात करते. म्हणजे जेव्हा ही दुखणी सुरू होतात तेव्हा कितीतरी उशीर झालेला असतो.
शिवाय जो साठा वयाच्या साठीनंतरकरिता ठेवलेला असतो तो आपण पंचविशीतच संपवून टाकतो. म्हणजे दुहेरी नुकसान आपण आपल्या शरीराचे करतो. मग हे सगळं समजल्यावर आपण जेव्हा पूर्ववत खायला सुरुवात करतो तेव्हा होते असे की, इतके दिवस उपाशी राहिल्याने आता अचानक इतक्या कॅलरी मिळू लागल्या म्हणून शरीर ते साठवायला सुरुवात करते जेणेकरून संपलेला साठा पूर्ववत होईल आणि यामुळे वजन पुन्हा वाढू लागते किंबहुना ते पूर्वीपेक्षा जास्तच वाढते आणि चरबीसुद्धा वाढते. कारण शरीरात काहीच पोषण उरलेले नसते. ते भरून काढावेच लागते. शिवाय अनेक दिवस उपाशी राहिल्याने पचनक्रियेवर परिणाम होतात आणि मग जेव्हा जेवण सुरू होते तेव्हा पचत नाही. पोटाचे त्रास होऊ लागतात. जर हे क्राश डाएट अनेक वर्ष चालले तर प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो.
आणि ज्या तरुण मुली हे करत असतात त्यांना तर खूप मोठा धोका असा असतो की, जेव्हा त्या माता बनतील त्यावेळी बाळाला पोषण तर मिळत नाही कारण त्यांच्याच शरीरात पोषण नाही व बाळामध्येसुद्ध काहीतरी व्यंग राहते, त्याला पुढे आजार होतात शिवाय स्वतःचेसुद्धा शरीर प्रतिकार शक्ती नसलेले बनते अगदी तरुण वयात.
आपले शरीर हे सगळ्या नैर्सार्गिक गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने पचवून त्यातून पोषण नीट मिळवू शकते कारण तशी आपली शरीर रचना आहे. हे हल्ली न जेवता शेक घेण्याचे वाढलेले प्रमाण शरीराचे जास्त नुकसान करत आहेत. तो शेक जितक्या किमतीचा आहे त्यापेक्ष्या निम्या किमतीत भाज्या फळे डाळी मिळतील व आरोग्य नीटच राहील. त्यासाठी शेक घ्याची गरजच नाही. त्याचा त्या चवीची सिंथेटिक पावडर रोज खाण्यापेक्षा रोज रुचकर व नैसर्गिक आहार जास्त निरोगी ठेवेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आहार संदर्भात जे लोक बोलून वेगवेगळ्या पावडरी विकतात ते खरंच आहार शास्त्रात पारंगत आहेत का? त्यांनी त्याचा काही आभ्यास केला आहे का? आहर शास्त्राची त्यांना कोणती पदवी आहे का? हे खात्री करून घ्या. कोणीही उठून तुमच्या शरीराची हेळसांड करतं केवळ तुमच्याकडे पैसे आहेत आणि त्यांना पैसे मिळवायचे म्हणून…! म्हणून जागरूक व्हा आणि स्वतःची काळजी घ्या.
नावीन्य खाण्यातले आणि जगण्यातले!
खर्पीेंरींळेप ळी पीें ींहश वळीर्लीेंशीू र्लीीं ळीीं ींहश ीशरीीरपसशाशपीं ेष ींहश ींहळपसी ीे ीर्शीीीेलशी र्रींरळश्ररलश्रश. म्हणजेच नावीन्यता हा शोध नाही तर आपल्या जवळ असलेल्या गोष्टींपासून कल्पकतेने नवीन काही बनवणे. आपण शोध कशाचा लावत नसतो कारण सगळे या निसर्गात आसमंतात भरून राहिलाले आहे, पण ते आपण पाहात नाही. आपल्या डोळ्यांवर लावलेली झापडे आपल्याला ते बघू देत नाहीत. मग जेव्हा दिसतं, तो शोध लागल्यासारखा वाटतो, पण हे नावीन्य खूप गरजेचे असते. हो, नावीन्य ही नुसतीच गम्मत वाटण्याची गोष्ट नाही तर ती आपल्या गरजा भागवण्यासाठीची गरज आहे. दिलेली टार्गेट वेळेत पूर्ण करायचे असेल तर तेच काम नावीन्य पूर्ण पद्धतीने केले तर काम लवकर व चांगले होते.
आयुष्यातला प्रत्येक सेकंद नवीन असतो. हा नवीन असतो कारण तो या आधी कधीच आलेला नसतो. तो नव्याने आलेला असतो, पण आपण त्या सेकंदाला नवीन काही करतो का? नावीन्य हे आपल्या विचारातून येतं, कृतीतून व्यक्त होते आणि नवीन असलेल्या गोष्टीचा हसत स्वीकार केला तर त्याचा नव्याने आनंद घेता येतो आणि समाधानी होता येते. म्हणजेच आपले समाधान आपला आनंद हा आपल्या नवीन विचार करण्यात आहे. तोच तो विचार, एकच एक ठरलेल्या गोष्टी करून करून आपले मन आपला मेंदू ठोकळा होतो आणि मग नवीन काही सुचेनासे होते. आयुष्य रटाळ वाटायला लागते. मग आहे त्याच गोष्टीत सुद्धा चुका दिसायला लागतात आणि चीडचीड, वाद सुरू होतात. तेच जर प्रत्येकाचा मेंदू प्रत्येकाचे मन नवीन काही करण्यात मग्न असेल तर दुसरा काय करतोय, त्याला त्रास द्यावा, एकमेकांचे पाय ओढणे यासाठी कुणाला वेळच मिळणार नाही आणि सगळ्यांची कल्पकता पणाला लागून नवीन काहीतरी तयार होईल आणि पर्यायाने सगळ्यांची प्रगती होईल.
म्हणजेच कल्पकता, नावीन्य आयुष्यातल्या प्रत्येकच गोष्टीत असले पाहिजे. आणि आपल्या दिनचर्येतील सगळ्यात महत्त्वाची, गरजेची व आवडीची गोष्ट कोणती असेल तर आपले खाणे, नाही का? सकाळी उठल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे विचार आधी धावतात ते चहा व नाश्त्याकडे. आज ऑफिसमधला नाश्ता कोणता होता, कसा होता हे सगळ्यांना अगदी लक्षात असते. किवा मिसळ कोणत्या दिवशी असणार आहे तो वार पाठ असतो! हो ना!
म्हणजेच आपले खाणे हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. मग आपल्या या खाण्यात आपण नावीन्य आणतो का हो कधी? खरे तर खाण्यातले नावीन्य हा नुसता चोचले पुरविण्याचा भाग नाही तर आपल्या प्रथिनांच्या, सर्व व्हिटामिन्सच्या गरजा भागवण्यासाठीची ती गरज आहे. जसे उन्हामध्ये जेवण खूप कमी जाते, पण प्रथिनांची शरीराला असलेली गरज कमी होत नाही. ही गरज भरून काढण्यासाठी आपली कल्पकता कामी येते. विशेषतः मुलांच्या बाबतीत. उन्हाळ्यात पोळी भात कमी खाऊन डाळींचे वेगळे पदार्थ खाल्ले तर ही गरज भरून निघू शकते. डाळ कडधान्य वापरून इडली डोसा खाऊ शकता. याच इडल्या भाज्या घालून करू शकता व कमी खाल्लेल्या पोळीचे गुण नाचणीच्या अम्बिलातून भरून काढू शकता. ताकातले नाचणीचे आंबील कॅल्शियम पण देते. शरीरातील उष्णता खूप वाढते या उन्हाळ्यात. ती कमी करायला रोज थोडे धने, जिरे व खडीसाखर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिले तर त्रास कमी होतो. भाजी पोळी नको वाटते खायला. या भाज्यांचे पण सरबत करता येते बरं का! काकडी व लिंबू सरबत, गाजर बिटाचे सरबत, आवळा सरबत व लिंबू सरबत हे क जीवनसत्व देणारे आहे ते घेऊ शकता. गुलकंद 2 चमचे पण उष्णता कमी करतो. भरपूर सर्व प्रकारची फळे खाऊन जीवनसत्व मिळतील व तहानही भागेल. आहारात जितके रंग जास्त तितका तो परिपूर्ण होत जातो.
मग आहार परीपूर्ण करायला तुमची कल्पकता वापरूनही रंग संगती साधू शकता. मुलांना प्रथिने, कॅल्शियम, लोह यांची खूप जास्त प्रमाणात गरज असते. ती आपल्या एकसुरी जेवणाने भागू शकत नाही. इथे नावीन्यपूर्ण पाककृती करून ही गरज भागवायला हवी. कारण लहान वयापासून मुलांच्या प्रत्येक जेवणात प्रथिने जातात ना याकडे लक्ष्य दिले तर त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल आणि एकाग्रत वाढेल. विशेतः उन्हाळा असला की जेवण कमी करतात मुले मग प्रथिने जात नाहीत पोटात आणि आजारी पडतात. म्हणून जे काही आपण खाऊ ते प्रथिनेयुक्त असावे. यासाठी इथे एक नावीन्यपूर्ण गोष्ट आपण कायम करुया. आपल्या पोळीच्या कणकेत कायम सोयाबीन पीठ आणि दूध पावडर घालूया. याने पोळीमधूनसुद्धा प्रथिने आणि कॅल्शियम सर्वांनाच मिळेल. कारण आपल्या जेवणात पोळीसारखी व रोजच असते.
असं नावीन्य खूप वेगवेगळ्या आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या वस्तूंपासून आपण निर्माण करू शकतो. अगदी कमी खर्चात.
लहान मुलांची पाटी पूर्ण कोरी असते. म्हणून ती जास्त कल्पक असतात. ती मुले ठोकताळ्यात जगत नाही म्हणून नवीन सतत नवीन काहीतरी निर्माण करतात. कशाला तरी काहीतरी जोडून पाहात असतात आणि नव निर्मिती अगदी लीलया करतात. तसे मोठ्या माणसांचे होत नाही. ठरवून दिल्याप्रमाणे आपण फक्त पोळी भाजी खात असतो. ती तर आहेच, पण नवीन काही तरी करून आपल्या खाण्याची पौष्टिक मूल्य वाढवूया. त्याचा आपल्याला नक्कीच फायला होईल.
शेवटी एकच केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! आपणच आहोत विचार करणारे व कृती करणारे. नवीन काही करून पाहायला सुरुवात आपल्यापासून करुया. असं नावीन्य निर्माण करायला थोडा धोका पत्करावा लागतोच. एकदा पाककृती बिघडेल पण त्यातूनही काहीतरी शिकायला मिळेल आणि पुढची अजूनच नवीन तयार होईल, पण करून तर बघू काहीतरी रोज नवीन.