आपल्याला नियमित काही खाल्ले तर त्याचा त्रास होतो. खाल्लेले पचत नाही, किंवा भूकच लागत नाही. छातीत जळजळ, तेलकट किंवा दुपारच्या जेवणाव्यतिरिक्तही काही खाल्ले तरी ते पचत नाही, म्हणून मग ते किरकोळ पित्तावर ढकलले जाते. पण मग त्याचा अति त्रास झाला की, मग डॉक्टरकडे जाण्यावाचून पर्याय उरत नाही. पित्तामुळे काही खाणे होत नाही. त्यामुळे मोजकाच आहार घेतला जातो. यामुळे एकप्रकारची त्रस्तता दिसून येते. मात्र यावर वेळीच इलाज न केल्यास याचा परिणाम पित्ताचे खडे होणे आदी सारख्या समस्या निर्माण होण्याकडे दिसून येतो. मग पित्ताचे खडे काढण्यासाठी ऑपरेशन केली जातात. पण एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पित्ताचे खडे पुन्हा होत नाहीत असेही नाही. त्यासाठी वेळीच उपाय, इलाज करणे आवश्यक असते.
पोटदुखीसारख्या वारंवार उद्भवणाऱ्या आजाराकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. काही घरगुती उपाय करून किंवा अशा दुखण्यांकडे दुर्लक्ष करून ती किरकोळ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बरे वाटेल म्हणून मग वाटही पाहिली जाते. मात्र मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, किंवा इतरवेळी वारंवार पोटात दुखणे हे नेहमीचेच म्हणूनही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तर काहीवेळा पोटात दुखण्याचे आपल्याच मनाने अंदाज लावून त्यावरील काही घरगुती औषधेही घेतली जातात.
(stomach ache head ache information )
एका महिलेच्या वारंवार पोटात दुखण्याच्या तक्रारीमुळे काही घरगुती इलाज केल्यानंतरही काही गुण नाही म्हणून मग डॉक्टरी उपाय करण्याचे ठरले. स्टोनमुळे पोटात दुखत असावे असा अंदाज करून डॉक्टरनेही त्यावरील औषधे सुरू केली. काही पथ्य सांगून औषधांना खर्चदेखील झाला. मात्र, तरीदेखील हे दुखणे सुरूच राहिल्याने शेवटी तज्ज्ञांकडून तपासणी केली असता, गंभीर आजाराचे निदान झाले. अगदी कोवळया वयाची मुले आपले डोके दुखते म्हणून अगदी डोके धरून बसतात.
यावेळी लहान मुलांना चष्मा लागणं स्वाभाविक आहे म्हणून त्यांना चष्मा असावा असा अंदाज करून डोकेदुखीच्या आजाराकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. शालेय जीवनात अशा तक्रारी वारंवार उद्भवताना दिसून येतात. चक्कर येणे, डोके दुखणे अशा आजाराकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या डोकेदुखीचे नेमके कारण काय आहे हे तज्ज्ञांकंडून जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्यावर वेळीच इलाज करणे आवश्यक आहे. वारंवार चक्कर येणे, शाळा, सार्वजनिक ठिकाणी मुलांना चक्कर येणे, डोकेदुखी वाढणे आदी गोष्टी या वाढत्या उन्हामुळे, अपु-या झोपेमुळे होऊ शकतात असा तर्क काढला जातो. मात्र वारंवार या तक्रारी जाणवल्या तर त्वरित डॉक्टरकडे जाणे हितावह ठरू शकते. (stomach ache head ache information )
