Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#रेसिपी : नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा अस्सल, चमचमीत, झणझणीत कटवडा

by प्रभात वृत्तसेवा
February 27, 2021
in रेसिपी
A A
#रेसिपी : नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा अस्सल, चमचमीत, झणझणीत कटवडा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वड्यासाठी : चार उकडलेले बटाटे , वाटीभर चिरलेला कांदा , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या , ७-८ कढीपत्त्याची पाने , एक छोटा चमचा हळद , मूठभर चिरलेली कोथिंबीर , एक चमचा आले-लसणाची पेस्ट , फोडणीसाठी-तेल , हिंग, जिरे, मोहरी , मीठ , पारीसाठी  , एक वाटी बेसन पीठ , हिंग, जिरे, तिखट , मीठ , बारीक चिरलेली कोथींबीर , कढीपत्त्याची पाने , चमचाभर मोहन , तळण्यासाठी तेल

कटासाठी : एक वाटी कांद्याची पेस्ट , एक वाटी टोमॅटो पेस्ट / प्यूरी , एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव (खोवलेलं खोबरं.) , एक वाटी फरसाणातील पापडी अथवा गाठी यांचा चुरा , एक वाटी स्मॅश केलेली बटाटा भाजी , एक तमालपत्र ,  ४ लवंगा  ,   पेरभर दालचिनिचा तुकडा  , एक टेबलस्पून लसूण पेस्ट , चवीनुसार मीठ , लाल मिरचीचे तिखट , दोन आमसुले

कृती

वड्यासाठी –  उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या.  गॅसवर एका कढईत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करा. त्यातच कांदा खरपूस परतून घ्या. ही फोडणी बारीक केलेल्या बटाट्यांच्या फोडीवर घाला. चवीनुसार मीठ घाला. आता या मिश्रणात आले-लसणाची पेस्ट मिसळा. या मिश्रणाचे लिंबाएवढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवा.

पारीचे सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवा. वड्यासाठी कढईत तेल तापायला ठेवा. या तेलातले एक चमचा तेल पारीच्या पीठात मोहन म्हणून घाला. कढईतील तेलात वडे तळून घ्या.

कटासाठी – गॅसवर एका पॅनमध्ये थोड्याशा तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी परतून घ्या. त्यावर कांदा पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यात ओल्या खोबऱ्याचा चव घालुन परता. मग टोमॅटो पेस्ट/प्यूरी घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या. हे सगळं मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा. बारीक केलेल्या मिश्रणात बटाट्याची भाजी आणि पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.

गॅसवर एका जाड बुडाच्या मोठ्या पॅनमध्ये जरा जास्त तेल घ्या. तेल तापून धूर येऊ लागला की गॅस बंद करा, तेल किंचित तापायला आलं की त्यात लाल मिरचीचे तिखट घाला. जळू देऊ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील बारीक केलेली पेस्ट घालून पुन्हा गॅस सुरू करा. पाहिजे तेवढं पाणी, मीठ आणि आमसुले घाला. चांगली उकळी आली की गॅस बंद करा. झणझणीत तर्रीचा कट तय्यार.

सर्व्हिंग डिशमध्ये दोन वडे घालून त्यावर कट ओता आणि वर फरसाण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घाला व थोडासा ओल्या खोबर्‍याचा चव पसरा अन लिंबाची फोड घालून सर्व्ह करा!

Tags: arogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहारकटवडा रेसिपी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar