पुणे – खगासन (Bakasana) हे विपरित शयन स्थितीतील आसन आहे. विपरित शयनस्थितीत पद्मासन घालावे. दोन्ही हात कोपरात दुमडून छातीजवळ न्यावेत. हाताचे तळवे जमिनीवर स्थिर करावे. श्वास घेत छाती उचलावी व फक्त डोके उचलून मागे टाकावे. दृष्टी आकाशाकडे स्थिर करावी. जेवढा वेळ श्वास रोखता येईल तेवढा वेळ रोखावा मग हळूहळू श्वास सोडत छाती आणि डोके पूर्वस्थितीत आणावे.
आसन स्थिती घेताच शरीर शिथिल करावे. या आसन जास्त वेळ टिकविता येत नाही. या आसनामुळे मधुमेह नियंत्रित होतो. श्वासाचे विकार बरे होतात. दमा ही बरा होण्यास मदत होते. दृष्टीदोष जातो. चक्कर बरी होते. पोट हलके बनते. छाती भरदार होते. काम स्फूर्तीसाठी पुरूषांनी हे आसन करणे लाभदायक आहे. संभोगक्रियेचा अधिक काळ आनंद या आसनाच्या नियमित सरावामुळे घेता येतो.
स्थूलता कमी होते. पोटातील अपान वायू निघून जातो. या आसनात शरीराची पक्षासारखी किंवा खगासारखी स्थिती होते म्हणून याला खगासन (Bakasana) म्हणतात. नाभीविकारही दूर होतात म्हणून प्रत्येक पुरूषाने खगासन (Bakasana) करावे. मात्र तज्ज्ञ योगशिक्षकाची मदत घ्यावी.