जेव्हा कोणी आजाराचे स्वत:च निदान करू लागले आणि नसलेल्या आजाराबद्दल काळजी करू लागले तर तो गंभीर मुद्दा बनतो. सध्या इंटरनेटची चलती असल्यामुळे सध्या सेल्फ डायग्नॉसिसचा ट्रेंड भलताच वाढला आहे. आपल्याला जेव्हा बरे वाटत नाही किंवा अस्वस्थ वाटू लागते त्या प्रत्येक वेळी आपण गुगलवर जाऊन लक्षणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षणांची कारणे आणि त्यावरील संभाव्य उपचार काय असू शकतील, याचीही आपण चाचपणी करून पाहतो. ( Medication Safety Tips )
दहापैकी आठ इंटरनेटचे यूजर्स आरोग्याबाबतची माहिती ऑनलाईन शोधत असतात, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे. यातील काही जणांना अशाप्रकारे माहिती शोधण्याचे व्यसन जडते. त्यालाच सायबर कॉन्ड्रिया म्हणजेच आरोग्याशी संबंधित प्रश्नांची ऑनलाईन माहिती शोधण्याचे व्यसन म्हणतात.
इंटरनेटवर अशाप्रकारे माहिती घेऊन कधी कधी आपल्याला नेमकी समस्या काय आहे हे समजते आणि त्यावर योग्य तो उपायही सापडतो. मात्र, ब-याच वेळा असे होते की, ऑनलाईन शोध आणि त्यातून मिळालेल्या माहितीमुळे आपल्याला किरकोळ लक्षणे अतिशय गंभीर वाटायला लागतात आणि ही गोष्ट अस्वस्थतेला जन्म देते. कारण नसताना आपण जास्तीची काळजी करायला लागतो. जेव्हा कोणी आजाराचे स्वत:च निदान करू लागले आणि नसलेल्या आजाराबद्दल काळजी करू लागले तर तो गंभीर मुद्दा बनतो. ( Medication Safety Tips )
आजाराचे स्वत:च निदान करून त्यावर औषधे घेणे ही गोष्ट आता अतिशय समान्य झालेली असून त्याला अनेक कारणे आहेत. वेळेची कमतरता, आरोग्य सुविधांची चणचण, आर्थिक अडचण, जागृतीचा अभाव, आक्रमक जाहिरातींना बळी पडणे आणि औषधांची सहज उपलब्धता या कारणांमुळे आजाराचे स्वत:च निदान करून औषधे घेण्याचा ट्रेंड बळावला आहे. औषधे शरीरावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम करत असतात. कुठलेही औषध घेण्यापूर्वी नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजारांच्या लक्षणांची माहिती ऑनलाईन शोधली तरी चालू शकेल. मात्र, त्यानंतर नियमित आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे.
स्वत:च औषधे घेण्याचे दुष्परिणाम ध्यानात ठेवा ( Medication Safety Tips )
आजाराचे अयोग्य निदान आणि त्यामुळे चुकीचे उपचार होण्याचा धोका. औषधामुळे अनपेक्षितपणे निर्माण होणारे आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतील असे धोके.
-योग्य आणि तातडीने आरोग्य सल्ला मिळत नाही.
– औषधामुळे होणारे परस्परविरोधी परिणाम आणि धोक्याच्या इशाऱ्यांची माहिती नसणे.
– बनावट औषधांचे सेवन केले जाण्याचा धोका.
– अत्यल्प किंवा अतिरिक्त औषध घेतले जाण्याचा धोका.
– अवलंबून राहण्याचे व्यसन.
– अन्न आणि औषधामुळे होणारे एकत्रित परिणाम.
– चुकीच्या निदानामुळे होणारे मानसशास्त्रीय परिणाम.
– लक्षणांच्या ऑनलाईन माहितीमधील कमतरता.