कोणतीही औषधे जितकी फायद्याची असतात, तशीच ती धोकादायकही ठरू शकतात. विशेषत: एखाद्या औषधाची तुम्हाला जर ऍलर्जी असेल, तर होणारे परिणाम हे न सांगता येण्याजोगेही असू शकतात. त्यामुळे आपल्याला नक्की कोणत्या प्रकारच्या औषधांची ऍलर्जी आहे, याची माहिती प्रत्येकाने करून घेणे आवश्यक असते. ( allergy medicine )
कोणत्या औषधाची कुणाला ऍलर्जी असते हे कुणीही सांगू शकत नाही. ऍलर्जीचे कारणही कुणी सांगू शकत नाही. शरीरामध्ये काही एन्झाइम्सची कमतरता असली तर ऍलर्जी होते असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
ऍलर्जीची लक्षणे
अंगाला खाज येणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे, ओठ सुजणे ही ऍलर्जीची सौम्य लक्षणे आहेत.
पण काही वेळा वारंवार उलट्या होतात.उलट्यामधून रक्त पडते. अतिशय थकवा येतो.नीट दिसत नाही. किंवा ऐकू येत नाही.ही लक्षणे गंभीर स्वरूपाची समजावीत.
ऍलर्जीचे शरीरावर होणारे परिणाम : ( allergy medicine )
त्वचा :
अंगाला खाज येते.अंगावर पुरळ किंवा भाजल्यासारखे फोड येतात
तोंड येणे :
तोंड आतून लाल होते. चट्टे पडतात.जेवताना किंवा चावताना आग होते. पाणीसुद्धा पिता येत नाही
दमा :
कधीकधी औषध घेतल्याबरोबर श्वासनलिका अवरुद्ध होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो.दम लागतो.
लाल पेशी नष्ट होतात :
रक्तातल्या लालपेशी नष्ट होतात. यालाच हिमोलिटीक जॉंडीस असे म्हणतात.
बोन मॅरो :
बोन मॅरो म्हणजे हाडांचा मगज. हाडांच्या या मगजामध्ये रक्ताची निर्मिती होत असते. ऍलर्जीमुळे बोन मॅरोमधल्या पांढऱ्या पेशींच्या निर्मितीमध्ये घट होते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते
लिव्हरमध्ये दोष :
काही औषधांमुळे यकृताचे कार्य बिघडते आणि कावीळ होते
काय करावे :
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या किंवा औषध घेतल्यावर ऍलर्जीची लक्षणे दिसताच डॉक्टरांना फोन करून कळवावे. ( allergy medicine )
काहीजण डॉक्टरांना न विचारताच औषधाच्या दुकानातून औषधे घेतात आणि त्याचे सेवन करतात. काही सर्दीपडशाच्या औषधांमुळे आणि खोकल्यावरच्या पातळ औषधांमुळे गुंगी येण्याची शक्यता असते.असे औषध ताबडतोब बंद करावे. चक्कर आणि गुंगी असेपर्यंत वाहन चालवू नये. घरी विश्रांती घ्यावी
डॉक्टरांनी एखादे औषध लिहून दिले असेल तर आणि त्याआधी तुम्ही आणखी दुसरी औषधे घेत असाल तर ती कोणती घेत आहात हे डॉक्टरांना सांगा.कधीकधी दोन्ही औषधांचा परिणाम म्हणून ऍलर्जी होते.
औषधांची नावे वेगळी असतात. आणि काही मिश्र औषधे असतात. बाटलीवरचे लेबल नीट वाचा. त्यातल्या कुठल्या घटक औषधामुळे आधी ऍलजी असेल तर ते औषध घेऊ नका
कोणतेही औषध चालू असताना मद्यपान करू नका. ते धोकादायक आहे.उदा. अंजायना या ह्रदयविकारावरचे नायट्रोग्लिसरीन नावाच्या गोळ्या सोबत मद्यपान केले तर रक्तदाब एकदम कमी होतो.
दुसऱ्याला एखाद्या औषधाची ऍलर्जी येत नाही म्हणजे तुम्हालाही ऍलर्जी होणार नाही असे समजू नका. कुणालाही कोणत्याही औषधाची ऍलर्जी असू शकते. दुसऱ्याला लिहून दिलेली औषधे तुम्ही घेऊ नका. किंवा तुम्हाला लिहून दिलेले औषध दुसऱ्याला देऊ नका औषध विकत घेताना गोळ्य्रांच्या रंगात बदल वाटला तर ते घेऊ नका. घरात काही औषधं शिल्लक असतील तर आणि तिच्यावरचे नाव वाचता येत नसेल तर ते औषध घेऊ नका. ( allergy medicine )
गोळ्या विकत घेताना शक्यतो स्ट्रिप पॅक घ्या. म्हणजे मुलांच्या हातात पडल्या तरी त्यांना त्या घेता येणार नाहीत. बाटल्यांमधल्या सुट्या गोळ्या कदाचित मुले खातात. त्यांना ऍलर्जी येऊ शकते ज्या औषधाची माहिती नसेल ते औषध घेऊ नका
कोणत्या कोणत्या गोळ्याची ऍलर्जी येते याची एक यादी करा. काही कारणाने नवीन डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तर ही यादी त्यांना दाखवा.