शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानं नवीन रक्तपेशीचं उत्पादन बंद होतं. यामुळं माणसाच्या शरीरात अॅनिमिया(anemia) आजार जन्म घेतो. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन अनियंत्रित होतं. यामुळं ब्लड प्रेशरचा आजार होतो.
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणं घातक असतं. यामुळं ब्रेनची न्यूरो सिस्टीम योग्य प्रकारे काम करत नाही. यामुळं मानसिक परेशानी होते. यामुळं डिप्रेशन आणि तणाव निर्माण होतो. आणि माणसाला ऊर्जाहीन वाटतं.
शरीरात रक्ताच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये प्रामुख्यानं थकवा, फीका चेहरा, दर्दनाक, पीरियड्स, श्वास फुलणं, हृदयाची धडधड वाढणं, हाता-पायात अशक्तपणा, डोकेदुखी, घाबरल्यासरखं वाटणं, त्वचा पिवळी पडणं, त्वचेत कोरडेपणा, केसगळती, तोंडावर सूज, जीभ अल्सर, भूक कमी लागणं, हाता-पाय थंड होणं, वारंवार इंफेक्शन होणं आदींचा समावेश आहे.
नॅशनल अॅनिमिया अॅक्शन काऊंसिल नुसार, आयर्नची कमतरता हिमोग्लोबीन लेव्हल कमी होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. हेच कारण आहे, की एक्सपर्ट आयर्ननं युक्त जसे की काळीज, लाल मांस, झींगा, टोफू, पालक, बदाम, खजूर, मसूर, धान्य, कस्तुरी, गाजर आणि शतावर खाण्याचा सल्ला देतात.