Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पायावर पडल्या असतील भेगा असतील तर हे उपाय करून करा गायब…

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2021
in आरोग्य वार्ता
A A
पायावर पडल्या असतील भेगा असतील तर हे उपाय करून करा गायब…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हातापायांना पडलेल्या भेगा लपविण्यापेक्षा त्यावर उपचार करून त्या बऱ्या करणे केव्हाही चांगले. दूरदर्शनवरील जाहिरातींमधून भेगा बुजविणाऱ्या अनेक मलमांविषयी सातत्याने दाखविले जात असते. ही मलमे उपयुक्‍त असतातही. शिवाय ती कायम वापरणे गरजेचे असते. घरात कायम ठेवता येणारे, तुलनेत स्वस्त आणि कोणताही अपाय न करणारे कोकम तेल या मलमांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करते.

जळवात हाता-पायांच्या भेगा बऱ्याच वेळा उग्ररूप धारण करतो. कंड, तळहात, तळपायाची कातडी निघणे, काही वेळा रक्‍त येणे असे प्रकारही आढळतात. त्यावर कोकम तेल गरम करुन हळूवारपणे टाचेला, तळहातांना लावावे. हातापायाच्या भेगातही कोकम तेल भरावे. जळवात कमी होतो.
नायटा हा एक प्रकारचा त्वचारोग आहे. नायटा झालेल्या जागेवर कडुनिंबाचे तेल व करंज तेल चोळून लावल्याने नायटा बरा होण्यास मदत होते. कडुनिंबाचे तेल व करंज तेल काष्ठौषधीच्या दुकानात मिळते.
बऱ्याच जणांना इसबाचा त्रास होतो. इसब हा खरेतर न बरा होणारा रोग आहे. मात्र योग्य उपचारांनी तो आवाक्‍यात ठेवता येतो. एरंडेल तेल 4 भाग व 1 भाग करंज तेल एकत्र करून इसब असलेल्या जागी लावावे. साबण अजिबात वापरू नये.

खरुज या त्वचारोगावरही कडूनिंब तेल अथवा करंज तेल चोळून लावावे. बऱ्याच वेळा सांध्याच्या ठिकाणी अथवा काख, मान, जांघ वा अन्य ठिकाणीही गळू होतो. गळू पिकून फुटेपर्यंत तेथे ठणका जाणवतो. या गळूवर शेपूची भाजी ठेचून बांधावी. त्याने गळू लवकर फुटते. तसेच शेंदूर व अंड्याचा पांढरा बलक एकत्र खलून लेप घातल्यानेही गळू लवकर फुटतेच, त्याचा संसर्ग अन्यत्र पसरण्यासही आळा बसतो.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorBenefits Of Neemblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthkokamkokum benefitslife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar