Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

श्‍वास अडकतो तेव्हा या पद्धतीने करा सोपे उपाय

by प्रभात वृत्तसेवा
January 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
श्‍वास अडकतो तेव्हा या पद्धतीने करा सोपे उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जेवताना घास घशात अडकला किंवा लहान मुलं खेळताना नाणं किंवा इतर वस्तू तोंडात टाकतात त्या घशात अडकल्याने गुदमरल्याचे लक्षण दिसते. असे प्रसंग बहुतेकांनी बघितले किंवा अनुभवले असतील. अशावेळेस काय करावे हे सुचत नाही. पण डॉ. हेमलीच यांनी या गुदमरण्यावर एक प्रभावी इलाज शोधून काढला आहे.त्याला “हेमलीच पध्दत’ असेच नाव आहे. गुदमरणाऱ्या व्यक्‍तीचा श्‍वास जरी अडला असला तरी फुफ्फुसामध्ये बरीच हवा शिल्लक असते. ती हवा जोर लावून बाहेर काढणे हाच गुदमरण्यावर प्रभावी उपाय आहे. छातीवर दाब देण्याने छातीतली ही हवा अतिशय वेगाने तोंडावाटे बाहेर येते आणि श्‍वास मोकळा होतो. (shortness of breath in marathi )

हेमलीच पध्दत
गुदमरणाऱ्या व्यक्‍तीच्या पाठीशी उभे रहा. मागून दोन्ही हातांनी कंबरेला विळखा घाला.त्या व्यक्‍तीचे डोके, मान, हात, छाती तुमच्या हातावर झुकू द्या. एका हाताची मूठ करुन छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध आणि पोटाजवळ जो खळगा असतो त्या भगावर मूठ आवळून धरा.आता ही मूळ दुसऱ्या हाताने घट्ट धरा आणि मूठीने खालून वरच्या दिशेने जोराने व झटक्‍याने दाब द्या. छाती आणि पोट यांच्यामध्ये एक आडवा पडदा असतो. त्याला डायफ्रॅम असे म्हणतात. तुमच्या मुठीने हा पडदा खालून वर जोराने ढकलायचा असतो. यामुळे छातीतली शिल्लक हवा जोराने तोंडातून बाहेर पडते. गुदमरलेली व्यक्‍ती बसलेल्या स्थितीत असेल तर तुम्ही त्याच्यामागे पाठीशी उभे रहा. आणि वर सांगितलेला उपाय करा.

गुदमरलेली व्यक्‍ती खाली झोपलेल्या स्थितीत असेल तर तिला उठवून बसवण्याचा किंवा उभे करण्याचा प्रयत्न करु नका. त्याला एका कुशीवर वळवा.पाठीवर झोपवा.दोन्ही हाताचे तळवे वर सांगितलेल्या जागी ठेवून जोरात झटक्‍याने दाब द्या.व्यक्‍तीच्या शेजारी गुडघ्यावर बसू नका.कारण मग छतीवर दाब देता येत नाही. हा दाब खालून वरच्या दिशेने द्यायला हवा. सरळ रेषते दाब दिला तर लिव्हर किंवा स्प्लीन या अवयवांना इजा होण्याची शक्‍यता असते.

गुदमरण्याची लक्षणे
घशात काही अडकले असेल तर श्‍वास घ्यायला त्रास होतो. श्‍वास थांबतो.ठसका लागतो.त्याला बोलता येत नाही.प्राणवायुचा पुरवठा थांबल्याने चेहरा पांढराफटक किंवा काळानिळा पडतो. उभ्याउभ्या तो कोसळतो आणि बेशुध्द पडतो.

गरोदर आणि लठ्ठ स्त्रीची मदत कशी करावी?
पाठीमागून दोन्ही हातांचा विळखा घालून मूठ वळून पोटावर न ठेवता छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध असलेल्या खळग्यावर ठेवावी आणि खालून वर झटक्‍याने दाब द्यावा.हातांनी दाब देऊन ओढू नये. त्यामुळे गर्भाशयाला दुखापत होऊ शकते. स्त्री लठ्ठ असेल तर मुठीचा दाब जरा जास्तच जोर देऊन लावावा लागतो.

स्वत:वरच गुदमरण्याची पाळी आली तर काय करावे? (shortness of breath in marathi )
तुम्ही वर सांगितलेला उपाय स्वत:वरच करु शकता. मूठ वळून पोटाच्यावरच्या भागवर ठेवावी आणि खालून वर झटक्‍याने दाब द्यावा किंवा खूर्चीच्या पाठीवर वा हातावर पोटाचा भाग ठेवून ओणवे व्हावे.आणि याच पध्दतीने खालून वर दाब द्यावा.

लहान मुले असतील तर…?
मुलांना नाजूकपणे हाताळावे लागते. मोठयांपेक्षा मुले जरा जास्तच कमजोर असतात. मुल गुदमरले असेल तर श्‍वास चालू करण्यासाठी दोन पध्दती आहेत. मोठयांमध्ये जसा जोराने दाब द्यावा लागतो तसा मात्र दाब द्यायचा नसतो. (shortness of breath in marathi )

पहिली पध्दत…
घाबरलेल्या आणि गुदमरलेल्या मुलाला आधी मांडीवर घ्या. पाठीमागून दोन्ही हातांची पहिली आणि मधली बोटे मुलाच्या पोटाच्यावरच्या भागावर ठेवा आणि खालून वर बोटांनी दाब द्यावा

दुसरी पध्दत…
मुलाला पाठीवर झेपवावे.आणि पोटाच्यावरच्या भागावर हातांची दोन्ही बोटे ठेवून खालून वर असा दाब झटक्‍याने द्यावा.(shortness of breath in marathi )

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar