चांगल्या प्रतीच्या अन्नपदार्थांमध्ये कमी दर्जांचे पदार्थ-मूळ अन्नपदार्थांशी मिळते-जुळते स्वस्त पदार्थ मिसळणे म्हणजे भेसळ.
रोजच्या दिनचर्येत वापरल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये अगदी सर्रास सरमिसळ केली जाते. विशेषतः जे अन्नपदार्थ सुटे घेतले जाते (उदा. किराणा माल, दूध, मिठाई आदी) त्यामध्ये भेसळ ( Food adulteration ) आढळून येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
काही छोट्याछोट्या गोष्टींद्वारा आणि प्रयोगांद्वारा आपण ही भेसळ ( Food adulteration ) सहज ओळखू शकतो आणि अशा पदार्थांना आपल्या जीवनातून आणि जेवणातून हद्दपार करू शकतो.
कसे ते पाहूयात
1) भेसळ ( Food adulteration ) कॉफी ः
कित्येकदा कॉफीच्या पावडरीमध्ये चिकोरीची पावडर मिसळलेली असते. चिमूटभर कॉफी पाण्यात टाकल्यावर कॉफी पावडर पाण्यावर तरंगते. तर चिकोरीची पावडर खाली बसते. शिवाय चिकोरी पावडरमुळे पाण्याला मातकट रंग येतो जो शुद्ध कॉफी पावडर टाकली असता येत नाही.
2) भेसळ ( Food adulteration ) दूध ः
दुधात पाणी, स्टार्चची भेसळ ( Food adulteration ) केली जाते. दूध एका चमच्यात घेऊन त्यावर आयोडीन द्रावणाचे 2-3 थेंब टाकल्यावर जांभळा रंग दिसला, तर स्टार्चचे अस्तित्व सिद्ध होते. पाण्याची भेसळ ( Food adulteration ) ओळखण्यासाठी एका काचेच्या पट्टीवरून दूधाचा थेंब खाली ओघळू द्यावा. थेंबामागे पांढरी रेषा दिसली तर दूध शुद्ध आहे. थेंब वेगाने ओघळला आणि काचेच्या पट्टीवर काहीही खूण राहिली नाही तर दुधात पाणी मिसळले आहे असे समजावे.
3) भेसळ ( Food adulteration ) मध :
मधामध्ये साखरेच्या पाकाची भेसळ ( Food adulteration ) केली जाते. ती ओळखण्यासाठी कापसाची वात करून ती मधात बुडवावी आणि ती वात ज्योतीवर-गॅसवर धरावी. शुद्ध मध असेल तर वात जळताना आवाज येत नाही. साखरेचा पाक मिसळला असल्यास वात जळताना कर्रकर्र असा आवाज येतो.
4) भेसळ ( Food adulteration ) तांदूळ :
याशिवाय तांदळात पांढरे खडे, बासमती तांदळामध्ये स्वस्तातले तांदूळ मिसळणे, मिरचीच्या पूडीत विट भुकटी मिसळणे, खव्यामध्ये स्टार्च पावडर, उकडलेल्या बटाट्याचा लगदा, धन्याची पावडरीमध्ये भुसा मिसळणे या आणि अशा अनेक प्रकारच्या भेसळ ( Food adulteration ) केल्या जातात.
5) भेसळ ( Food adulteration ) पिठीसाखर ः
पिठीसाखरेत खाण्याचा सोडा मिसळला जोता. थोडेसे हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळल्यास फेस दिसून येतो. खडूची पावडरही टाकली जाते. जी पाण्यात टाकली असता खाली बसते.
6) भेसळ ( Food adulteration ) तूप ः
तुपात वनस्पती तूप मिसळले जाते. हे तूप लवकर खवट होते. शिवाय वनस्पती तुपाचा गोठणबिंदूही जास्त असतो.
7) भेसळ ( Food adulteration ) केशर ः
केशरमध्ये मक्याच्या कणसातील धागे रंग देऊन मिसळले जातात. शुद्ध केशराचे सहज तुकडे पडत नाहीत, पण मक्याचे धागे असतील तर ते लवकर तुटतात आणि विरघळतही नाहीत. टीपकागद पद्धतीनेही ही भेसळ ( Food adulteration ) ओळखता येते.
8) भेसळ ( Food adulteration ) चहा पावडर ः
चांगल्या चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर रंग देऊन मिसळली जाते. टीपकागद जरासा ओला करून त्यावर चहाची पावडर शिंपडल्यास टीपकागदाला रंग लागतो.
9) भेसळ ( Food adulteration ) डाळ ः
डाळींना रंग देऊन आकर्षक बनविले जाते. हे रंग आरोग्यासाठी अपायकारक असतात. थोडी डाळ पाण्यात टाकून त्यावर हायड्रोक्लोरिक आम्लाचे थेंब टाकल्यास जांभळा रंग दिसतो.
10) भेसळ ( Food adulteration ) मिरे ः
काळ्या मिऱ्यांमध्ये पपईच्या बिया टाकल्या जातात, पण लक्षपूर्वक पाहिल्यास पपईच्या बियांचा गोलसर आकार आणि फिकट रंग सहज ओळखू येतो.