Hyderabad Tourism : ‘हैदराबाद’ शहर तेलंगणा राज्याची राजधानी आहे, जे आपल्या संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे, हे शहर निश्चितपणे प्रवासाची आवड असलेल्यांच्या यादीत पाहिलं असेल. ऐतिहासिक आणि आधुनिक भारताची झलक या शहरात पाहायला मिळते. तसेच शहरात खानपानाची देखील चान्गलीच रेलचेल असते. हैदराबादमध्ये तुम्ही कोणत्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता याबद्दल आज आम्ही सांगत आहोत…
चारमिनार –
चारमिनार ही हैदराबादची खास ओळख असल्याचे म्हटले जाते, जे 1591 मध्ये बांधले गेले. ही 4 मजली इमारत इस्लामिक शैलीत बांधण्यात आली आहे. या शहराचा दौरा चारमिनारशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे हैदराबादला गेले की याठिकाणी पहिली भेट द्या.
मक्का मशीद –
चारमिनारजवळ मक्का मस्जिद आहे जी 400 वर्षांपूर्वी मुहम्मद कुली कुतुबशाहने बांधली होती, या मशिदीमध्ये सुमारे 10,000 लोक एकाच वेळी नमाज अदा करू शकतात.
गोलकोंडा किल्ला –
गोलकोंडा किल्ला ही हैदराबादची एक ऐतिहासिक इमारत आहे जी 11 व्या शतकात बांधली गेली आहे, येथे तुम्ही संध्याकाळी लाइट आणि साउंड शो पाहू शकता, तो सकाळी 9 वाजता सर्वसामान्यांसाठी खुला होतो.
रामोजी फिल्म सिटी –
रामोजी फिल्म सिटी हैदराबादपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते. हे जगातील सर्वात मोठे स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे जे सुमारे 2000 एकरमध्ये पसरलेले आहे. बाहुबलीसह अनेक मोठ्या चित्रपटांचे सेट येथे पाहायला मिळतील.
हुसेन सागर तलाव –
हुसेन सागर तलाव हैदराबाद आणि सिकंदराबादला जोडतो, ज्याच्या मध्यभागी महात्मा बुद्धांची एक विशाल मूर्ती आहे. येथे तुम्ही फेरी राईड आणि बोट राईडचा आनंद घेऊ शकता.
The post Hyderabad Tourism : चारमिनार ते स्वादिष्ट बिरयानी…. ‘हैदराबाद’ला फिरायला जाताय तर ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या ! appeared first on Dainik Prabhat.