Jeans Wash – पुरुष असो वा स्त्री किंवा लहान मूल… प्रत्येकाला जीन्स (डेनिम) (Jeans) घालणे आवडते. बाजारातही जीन्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. ठिकठिकाणी फाटलेल्या जीन्सपासून (Jeans) बेल बॉटमपर्यंत, लो वेस्टपासून स्किन टाईटपर्यंत बाजारात अनेक प्रकारच्या जीन्स उपलब्ध आहेत. प्रत्येक जीन्स एकमेकांपेक्षा वेगळी असते.
प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये किमान 2-3 जीन्स (Jeans) सहज सापडतात. हे एक कठीण फॅब्रिक आहे, म्हणून बरेच लोक ते धुताना चुका करतात. अशा परिस्थितीत, जीन्सचा (Jeans Wash) रंग आणि त्याची चमक किंवा त्याचा लूक खराब होण्याची मोठी शक्यता असते.
मग जीन्स (Jeans) कितीही नवीन आणि महाग असली तरी ती जुनीच दिसू लागते. मात्र, अशा परिस्थितीत घरी जीन्स (Jeans) कशी धुवायची आणि त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत…
जीन्स किती वेळा धुवावी ?
जीन्स (Jeans Wash) वारंवार धुण्याने ती खराब होते. म्हणून, महिन्यातून एकदा किंवा कमीत-कमी 10 वेळा परिधान केल्यानंतर जीन्स धुवा. अन्यथा काही डाग किंवा घाण असल्यास, ते धुतले तर चालेल. पण तुम्हाला तुमची जीन्स वर्षानुवर्षे नवीन दिसायची असेल, तर ते शक्य तितके कमी धुवा.
हाताने जीन्स कशी धुवावी ?
– सर्वप्रथम जीन्सची झिप आणि बटण ओपन करा. त्यानंतर जीन्स आतून बाहेर करा.
– कोमट पाण्याने बादली भरा आणि डिटर्जंट द्रवाचे (पावडर) काही थेंब घाला.
– आता या द्रावणात जीन्स भिजवा आणि जास्त न घासता डाग काढण्याचा प्रयत्न करा.
– नंतर जीन्स किमान 60 मिनिटे भिजवू द्या. आणि जीन्स वॉशिंग मशीनमध्ये फिरवा आणि सुकविण्यासाठी लटकवा.
वॉशिंग मशीनमध्ये जीन्स कशी धुवावी ?
– गडद कपड्यांसाठी डिझाइन केलेले डिटर्जंट वापरा. यामुळे जीन्सचा रंग फिका पडत नाही. आपण पांढरे डिस्टिल्ड व्हिनेगर देखील वापरू शकता.
– मशीनमध्ये जीन्सच्या दोनपेक्षा जास्त जोड्या ठेवू नका. मशीनमध्ये एकाच रंगाची जीन्स एकत्र चालवण्याचा प्रयत्न करा.
– तुमच्या जीन्स ड्रायरमध्ये वाळवण्याऐवजी खुल्या हवेत वाळवा. यामुळे जीन्सच्या फॅब्रिकचे नुकसान होणार नाही आणि त्याचा लूक देखील तसाच राहील.
जीन्स धुतल्यानंतर पटकन कशी सुकवणार ?
– जीन्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला सर्व प्रकारच्या कपड्यांवर ट्राय करू शकता. डेनिम खूप जाड असल्याने ते सुकायला खूप वेळ लागतो. जर तुम्हाला तुमची जीन्स धुऊन पटकन सुकवायची असेल तर त्यांना बाहेर मोकळ्या हवेत लटकवा. जेणेकरून तुमची जीन्स लवकर सुकेल.
जीन्स धुताना ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवा ?
– डेनिममध्ये सीक्वेन्स वर्क असल्यास, ते मशीनऐवजी हाताने धुवा.
– जर तुम्ही पहिल्यांदा नवीन जीन्स धुत असाल तर नेहमी थंड पाण्यात आणि मीठाने हाताने धुण्याचा प्रयत्न करा.
– जास्त उष्णतेमुळे डेनिमच्या स्ट्रेचेबल फॅब्रिकचे नुकसान होऊ शकते.
– लक्षात ठेवा की जीन्स खूप गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त झाल्याशिवाय धुण्याची गरज नाही.
– फाटलेले डेनिम आपल्या हातांनी धुवा.
The post How to Wash Jeans : तुमची जीन्स कधीच होणार नाही जुनी; धुताना फॉलो करा ‘या’ खास टिप्स ! appeared first on Dainik Prabhat.