Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

How to remove lice: पावसाळ्यात उवांचा त्रास वाढला? जाणून घ्या डोकं स्वच्छ ठेवण्याचे ३ घरगुती उपाय

by
August 23, 2025
in लाईफस्टाईल
A A
How to remove lice: पावसाळ्यात उवांचा त्रास वाढला? जाणून घ्या डोकं स्वच्छ ठेवण्याचे ३ घरगुती उपाय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

How to remove lice: पावसाळा हा जरी थंडावा आणि आनंद घेऊन येणारा ऋतू असला तरी या दिवसांत आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. खोकला, सर्दी, ताप यांसोबतच आणखी एक त्रास अनेकांना सहन करावा लागतो तो म्हणजे डोक्यातील उवा आणि बारीक लीखांचा त्रास. पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असते. केस सतत ओले राहतात आणि त्यामुळे उवा पसरायला पोषक वातावरण मिळते.

केस धुतल्यावर अनेकजण केस पुसण्यासाठी एकच टॉवेल वापरत असेल किंवा केस विंचरण्यासाठी एकाच कंगव्याचा वापर करत असतील तर उवा लवकर पसरतात. एकदा डोक्यात उवा झाल्या की सतत खाज सुटते आणि डोकं खाजवल्यामुळे जखम होण्याचीही शक्यता असते.

अनेकजण बाजारात मिळणारे शॅम्पू किंवा लोशन वापरतात. खरं तर त्यामुळे उवा मरतात, पण त्यात असलेल्या रसायनांमुळे केसांची मुळं कमकुवत होऊन केस गळायला सुरुवात होते. अशा वेळी घरगुती नैसर्गिक उपाय सुरक्षित ठरतात.

उवांपासून सुटका मिळवण्यासाठी ३ सोपे घरगुती उपाय

१. कांद्याचा रस

कांदा किसून किंवा वाटून त्याचा रस काढा. हा रस थेट केसांच्या मुळाशी चांगल्या प्रकारे लावा. हा रस लावताना त्यात नारळ तेल मिसळलं तर चालतं. डोक्यावर कापड बांधून १५ मिनिटं ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. कांद्याच्या रसामुळे उवा मरतात आणि खाज कमी होते.

२. कडुनिंबाच्या पाण्याचा स्प्रे

कडुनिंबाची पानं धुऊन पाण्यात उकळा. थंड झाल्यावर पाने पाण्यात चोळून त्याचा अर्क काढा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून केस धुतल्यानंतर डोक्यावर शिंपडा. २० मिनिटं ठेवून मग पुन्हा केस स्वच्छ धुवा. कडुनिंबाच्या पानात उवांवर नियंत्रण ठेवणारे नैसर्गिक घटक असतात.

३. नारळ तेल आणि कापूर

एका पॅनमध्ये नारळ तेल गरम करून त्यात कापूर टाका. गॅस मंद आचेवर ठेवा आणि नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. केसांवर लावून १५ मिनिटं ठेवा आणि मग धुवा. या उपायामुळे उवा मरतात तसेच केसही मऊ राहतात.

काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे

उवा झालेल्या व्यक्तीचा टॉवेल, उशी किंवा कंगवा वापरू नये.
केस नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावेत.
आठवड्यातून किमान एकदा केस नीट धुवावेत.
केस धुतल्यानंतर बारीक दातांची कंगवी वापरल्यास मृत उवा व लीख सहज निघून जातात.

हे उपाय नियमित केल्यास उवा आणि लीखांपासून आराम मिळतो आणि केसांना काहीही नुकसान न होता डोकं स्वच्छ राहतं.

 

Join our WhatsApp Channel

The post How to remove lice: पावसाळ्यात उवांचा त्रास वाढला? जाणून घ्या डोकं स्वच्छ ठेवण्याचे ३ घरगुती उपाय appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar