साहित्य :
बारीक चिरलेली कोथिबीर दोन वाट्या, सात-आठ हिरव्या मिरच्या अगर एक मोठा चमचा लाल तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, एक चमचा जिरे, एक चमचा तीळ, पाव चमचा हिंगपूड, पाव चमचा एक वाटी हरभरा डाळीचे ( kothimbir vadi recipe in marathi )
कृती :
चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, जिरे, तीळ, हळद दोन चमचे तेल सर्व एकत्र करावे. त्यात पीठ कालवावे. गाळा एकजीव होण्यापुरते पाणी थोडेथोडे घालावे. हाताला तेल लावून गोळा एकजीव करता येण्याइतपत झाला की लांबट गोल करून तो वाफवून घ्यावा. दहा मिनिटे वाफवल्यानंतर गार झाल्यानंतर सुरीने कापून वडया तळाव्यात. फ्रीजमध्ये गोळा उकडून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी वड्या तळल्या तरी चालतात. ( kothimbir vadi recipe in marathi )